जया यांचं स्टेटमेन्ट बच्चन कुटुंबाला पडणार महागात, पापाराझी उचलणार मोठं पाऊल! म्हणाले, 'त्यांना कळत नसेल तर...'
- Published by:Minal Gurav
Last Updated:
ज्येष्ठ अभिनेत्री जया यांनी पापाराझींबद्दल केलेलं वादग्रस्त स्टेटमेन्ट बच्चन कुटुंबाला महागात पडणार असं दिसतंय. जया बच्चन यांच्या स्टेटमेन्टवर पापाराझी मोठं पाऊल उचलणार....?
advertisement
advertisement
एका कार्यक्रमात पत्रकार बरखा दत्त यांच्याशी बोलताना जया बच्चन यांनी पॅप्सवर टीका केली. त्या म्हणाल्या, "मी मीडियाचं प्रोडक्ट आहे. माझे वडील पत्रकार होते. पण हे पॅपराझी कोण आहेत? कोणत्याही प्रकारचं ट्रेनिंग नाही, नालीतल्या पाईपसारखे टाइट, घाणेरड्या पॅन्ट्स घालून, हातात मोबाइल घेऊन फिरतात आणि फोटो काढतात. हे मीडिया कसे? त्यांचं एज्युकेशन काय? बॅकग्राऊंड काय?"
advertisement
जया बच्चन यांच्या वक्तव्यावर पपाराझींची संतापजनक प्रतिक्रिया समोर आली आहे. पॅप पल्लव पालीवाल म्हणाले, "त्या जे बोलल्यात ते दुर्दैवी आहे. त्यांच्या नातू अगस्त्य नंदाची 'इक्कीस' फिल्म रिलीज होतेय. प्रमोशनला पॅपराझी नसेल तर काय होईल? अमिताभ बच्चन प्रत्येक रविवारी घराबाहेर येतात ते आम्हीच कव्हर करतो. तिथे कोणी नॅशनल मीडिया नसते. एखाद्याच्या कपड्यांवर किंवा रूपावरून त्याला जज करणं योग्य नाही. डिजिटल युगातल्या बदल त्यांना कळत नसतील किंवा त्या स्वीकारत नसतील तर त्यांच्या टीमने त्यांना समजावायला हवं."
advertisement
advertisement
advertisement


