'जर तुम्हाला ड्रामा हवा असेल...' राज निदिमोरूच्या लग्नाच्या 3 दिवसांनी पहिल्या पत्नीची रोखठोक पोस्ट, सांगितला 'तो' कठीण काळ

Last Updated:
Raj Nidimoru First Wife: राज निदिमोरू यांची पहिली पत्नी श्यामली डे यांनी समंथा आणि राजच्या लग्नानंतर तीन दिवसांनी, ४ डिसेंबर रोजी श्यामली यांनी सोशल मीडियावर मोठी प्रतिक्रिया दिली आहे.
1/7
मुंबई: दाक्षिणात्य अभिनेत्री समंथा रुथ प्रभू आणि दिग्दर्शक राज निदिमोरू यांनी गुपचूप लग्न केल्यानंतर त्यांच्या या सीक्रेट लग्नाची चर्चा सुरू असतानाच, आता राज निदिमोरू यांची पहिली पत्नी श्यामली डे यांनी एक मोठी आणि भावनिक पोस्ट लिहून सर्वांनाच धक्का दिला आहे. समंथा आणि राजच्या लग्नानंतर तीन दिवसांनी, ४ डिसेंबर रोजी श्यामली यांनी सोशल मीडियावर मोठी प्रतिक्रिया दिली आहे.

advertisement
2/7
राज आणि श्यामली यांचा घटस्फोट २०२२ मध्ये झाला असला तरी, राजने समंथासोबत पहिल्या पत्नीला धोका दिला असल्याच्या चर्चा सोशल मीडियावर रंगत आहेत. या पार्श्वभूमीवर श्यामली यांची ही पोस्ट खूपच महत्त्वाची मानली जात आहे.

3/7
श्यामली डे यांनी इन्स्टाग्रामवर एक लांब नोट लिहित आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
श्यामली डे यांनी इन्स्टाग्रामवर एक लांब नोट लिहित आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. "तुमच्या प्रेमासाठी, शुभेच्छांसाठी, चांगल्या शब्दांसाठी आणि आशीर्वादांसाठी मी तुमची आभारी आहे," अशा शब्दांत त्यांनी सुरुवातीला चाहत्यांचे आभार मानले.
advertisement
4/7
त्यांनी पुढे लिहिले,
त्यांनी पुढे लिहिले, "मी एक रात्र तळमळत काढली, एका कुशीवरून दुसऱ्या कुशीवर वळत राहिले आणि स्वतःशीच विचार करत राहिले. तेव्हा माझ्या लक्षात आले की, माझ्यापर्यंत येत असलेल्या या चांगुलपणाची कबुली न देणे, हे कृतघ्न आणि असभ्यपणाचे ठरेल."
advertisement
5/7
श्यामली डे यांनी सांगितले की, या कठीण काळात त्या 'ट्विन हार्ट्स मेडिटेशन'चा आधार घेत आहेत, ज्यामुळे त्यांना क्षमा करणे सोपे जात आहे.
श्यामली डे यांनी सांगितले की, या कठीण काळात त्या 'ट्विन हार्ट्स मेडिटेशन'चा आधार घेत आहेत, ज्यामुळे त्यांना क्षमा करणे सोपे जात आहे. "मी अनेक वर्षांपासून 'ट्विन हार्ट्स मेडिटेशन'चा सराव करत आहे. यामध्ये पृथ्वीमातेला आणि सर्व व्यक्तींना शांतता, प्रेम, क्षमा, आशा, प्रकाश, आनंद आणि शुभेच्छा देण्याचा समावेश आहे. मी जी ऊर्जा इतरांना देत आहे, तीच आता माझ्याकडे परत येत आहे."
advertisement
6/7
श्यामली यांनी आपले सोशल मीडिया सांभाळण्यासाठी पीआर टीम नसल्याचे स्पष्ट केले आणि ड्रामा शोधणाऱ्यांना दूर राहण्याची विनंती केली.
श्यामली यांनी आपले सोशल मीडिया सांभाळण्यासाठी पीआर टीम नसल्याचे स्पष्ट केले आणि ड्रामा शोधणाऱ्यांना दूर राहण्याची विनंती केली. "माझी विनम्र विनंती आहे, कृपया ही जागा स्वच्छ ठेवा. धन्यवाद... तुम्हाला लक्ष वेधून घेणाऱ्या गोष्टी, ब्रेकिंग न्यूज, एक्सक्लुझिव्ह मुलाखती, सहानुभूती किंवा ब्रँड प्रमोशन येथे मिळणार नाही," असे त्यांनी स्पष्ट केले.
advertisement
7/7
श्यामली डे यांनी या पोस्टमध्ये राज किंवा समंथाचा थेट उल्लेख केलेला नसला तरी, सोशल मीडिया युजर्सनी ही पोस्ट नवविवाहित जोडप्यासाठीच असल्याचा अंदाज लावला आहे.
श्यामली डे यांनी या पोस्टमध्ये राज किंवा समंथाचा थेट उल्लेख केलेला नसला तरी, सोशल मीडिया युजर्सनी ही पोस्ट नवविवाहित जोडप्यासाठीच असल्याचा अंदाज लावला आहे.
advertisement
Eknath Shinde Uddhav Thackeray: कोकणातून सुरुवात, राज्यातही सूर जुळणार? शिंदे गटात अस्वस्थता, मातोश्रीवर 'घरवापसी'च्या हालचाली!
कोकणातून सुरुवात, राज्यातही सूर जुळणार? शिंदे गटात अस्वस्थता, 'घरवापसी' होणार
  • कोकणातून सुरुवात, राज्यातही सूर जुळणार? शिंदे गटात अस्वस्थता, 'घरवापसी' होणार

  • कोकणातून सुरुवात, राज्यातही सूर जुळणार? शिंदे गटात अस्वस्थता, 'घरवापसी' होणार

  • कोकणातून सुरुवात, राज्यातही सूर जुळणार? शिंदे गटात अस्वस्थता, 'घरवापसी' होणार

View All
advertisement