advertisement

Mumbai Rain: मुंबई, ठाण्याच्या हवामानात मोठे बदल, श्रावणात पावसाऐवजी उकाडा, 1 ऑगस्टचा हवामान अंदाज

Last Updated:
Mumbai Rain: ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीलाच हवामानात मोठे बदल जाणवत आहेत. मुंबईसह ठाणे परिसरातील पुढील 24 तासांचा हवामान अंदाज जाणून घेऊ.
1/5
पावसाळा सुरू होऊन जून आणि जुलै महिने उलटून गेले तरीही ऑगस्टच्या पहिल्याच दिवशी पावसाने कोकणकिनारपट्टीवर दांडी मारल्याचं स्पष्टपणे जाणवतंय. श्रावण महिना सुरू असूनही मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पालघर आणि कोकणातील महत्त्वाच्या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाऐवजी हलक्या सरींचं वातावरण आहे. परिणामी या भागांत उकाडा आणि दमटपणा वाढला आहे.

2/5
मुंबईत गेल्या काही दिवसांत ढगाळ वातावरण असून अधूनमधून पावसाच्या हलक्या सरी बरसत आहेत. जुलैच्या उत्तरार्धात काही ठिकाणी जोरदार पाऊस झाला होता, पण ऑगस्टच्या सुरुवातीलाच पावसाने विश्रांती घेतली आहे. आजही शहरात आकाश ढगाळ राहील, आणि काही भागांतच रिमझिम पावसाची शक्यता आहे. दमट हवामान आणि उष्णता वाढल्याने मुंबईकरांना घामेजणारा दिवस जाणवेल. मुंबईत आज कमाल तापमान 30–31 अंश सेल्सियस, किमान तापमान 25 अंश सेल्सियस असेल.

3/5
नवी मुंबई आणि ठाणे परिसरातही पावसाच्या सरी हलक्याच राहणार आहेत. मागील आठवड्यात जसा पाऊस होता, तसा जोर आता नाही. ढगाळ वातावरण राहील, मात्र दिवसभर उकाडा अधिक जाणवणार आहे. काही भागांत रिमझिम पावसाची शक्यता असून, जोरदार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिलेला नाही. आज या भागात कमाल तापमान 30 अंश सेल्सियस, किमान तापमान 25 अंश सेल्सियस राहील.
नवी मुंबई आणि ठाणे परिसरातही पावसाच्या सरी हलक्याच राहणार आहेत. मागील आठवड्यात जसा पाऊस होता, तसा जोर आता नाही. ढगाळ वातावरण राहील, मात्र दिवसभर उकाडा अधिक जाणवणार आहे. काही भागांत रिमझिम पावसाची शक्यता असून, जोरदार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिलेला नाही. आज या भागात कमाल तापमान 30 अंश सेल्सियस, किमान तापमान 25 अंश सेल्सियस राहील.आज या भागात कमाल तापमान 30 अंश सेल्सियस, किमान तापमान 25 अंश सेल्सियस राहील.
advertisement
4/5
पालघर जिल्ह्यात मागील काही दिवसांमध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला होता. पण आता हवामान शांत झालं असून, आज ढगाळ वातावरण राहील. तुरळक भागांमध्ये हलक्या सऱ्या पडू शकतात. मात्र कोणताही हवामान अलर्ट नाही. दिवसभर उष्णता आणि आर्द्रता अधिक जाणवेल.

5/5
कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड जिल्ह्यांमध्ये जुलै महिन्याच्या मध्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली होती. मात्र सध्या या भागांमध्ये वातावरण तुलनेने स्थिर आहे. आज कोणताही हवामान अलर्ट नाही, आणि मुसळधार पावसाची शक्यताही कमी आहे. काही भागांत ढगाळ वातावरण आणि रिमझिम पावसाची शक्यता आहे. किनारपट्टीच्या भागांत आर्द्रता अधिक जाणवेल.

SIM Cardमधून काढलं 26,55, 424 रुपयेचे सोनं; जुन्या सिम कार्डसाठी मार्केटमध्ये झुंबड उडाली, पण एका चुकीने जीवही जाऊ शकतो
SIM Cardमधून काढलं 26,55,424 रुपयेचे सोनं; जुन्या सिम कार्डसाठी झुंबड उडाली
  • जुन्या SIM कार्डमधून निघालं सोनं

  • SIM कार्डसाठी लोकांची झुंबड

  • पण एका चुकीने जीवही जाऊ शकतो

View All
advertisement