Weather Alert: 24 तास मुसळधार! संपूर्ण कोकणात पावसाचं धुमशान, मुंबई, ठाण्याला अलर्ट

Last Updated:
Mumbai Rain: मुंबईसह कोकणात पावसाचा जोर पुन्हा वाढला आहे. आज कोकण किनारपट्टीवरील सर्वच जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.
1/5
गेल्या दोन दिवसांपासून कोकण किनारपट्टीवर पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. अनेक ठिकाणी मुसळधार पावसामुळे हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला होता. आज, 13 ऑगस्ट रोजी, परिस्थिती तशीच राहणार असून मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड या सर्व जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट देण्यात आला आहे. पावसामुळे वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता असून प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

advertisement
2/5
मुंबईत आज दिवसभर मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे. काही भागांमध्ये अल्पावधीत मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. लोकल ट्रेनचे वेळापत्रक पावसामुळे विस्कळीत होऊ शकते, त्यामुळे प्रवाशांनी प्रवासाआधी वेळापत्रक तपासावे. कमाल तापमान सुमारे 29°C तर किमान तापमान 25°C च्या आसपास राहण्याची शक्यता आहे.

3/5
ठाणे आणि नवी मुंबईतही आज हवामानाची परिस्थिती मुंबईसारखीच राहणार आहे. दिवसात हलक्या सरींबरोबरच काहीवेळी जोरदार पावसाचा मारा होऊ शकतो. रस्त्यांवर पाणी साचण्याची शक्यता असल्याने वाहनचालकांनी काळजी घ्यावी. ठाण्यात कमाल तापमान सुमारे 30°C, नवी मुंबईत 29°C राहील, तर किमान तापमान 25–26°C दरम्यान असेल

4/5
मुंबई ठाण्याप्रमाणे आज पालघरला देखील यलो अलर्ट दिला आहे.पालघर जिल्ह्यात आज पावसाचा जोर वाढणार असून मध्यम ते जोरदार सरींचा अंदाज आहे. ग्रामीण भागांमध्ये रस्ते चिखलमय होऊ शकतात. समुद्रकिनारी भागात जोरदार वारे वाहू शकतात, त्यामुळे मच्छीमारांनी खोल समुद्रात न जाण्याचा सल्ला दिला आहे. कमाल तापमान 30°C आणि किमान तापमान 25°C राहील.

5/5
रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड या तिन्ही जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट जारी असून आज दिवसभर जोरदार पावसाची शक्यता आहे. डोंगराळ भागात भूस्खलनाचा धोका असल्याने सावधानता बाळगण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. रत्नागिरीत कमाल तापमान 29°C, सिंधुदुर्गात 30°C आणि रायगडात 29°C राहील. किमान तापमान सर्वत्र 24–25°C च्या आसपास असेल.

Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement