Mumbai Rain: रेनकोट सोबत ठेवा, मुंबई, ठाण्यात आज पुन्हा धो धो पाऊस, कोकणात यलो अलर्ट

Last Updated:
Mumbai Rain: कोकण किनारपट्टीवर गेल्या काही दिवसांत पावसाचा जोर वाढला आहे. आज पुन्हा मुंबई, ठाण्यासह 6 जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.
1/5
गेल्या काही दिवसांपासून कोकण किनारपट्टीवर पावसाचा जोर वाढला आहे. मुंबई, ठाण्यासह उपनगरांत देखील जोरदार पाऊस होतोय. आज पुन्हा मुसळधार पावसाची शक्यता असून हवामान विभागाने मुंबईसह कोकणातील 6 जिल्ह्यांना यलो अलर्ट दिला आहे. आजचा हवामान अंदाजाबद्दल जाणून घेऊ.

advertisement
2/5
मुंबईत आज सलग तिसऱ्या दिवशी पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे. आज काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज आहे. त्यामुळे नागरिकांना बाहेर पडताना योग्य ती खबरदारी घ्यावी लागणार आहे. तापमान कमाल 30 अंश सेल्सियस तर किमान 25 अंशांच्या आसपास राहण्याची शक्यता आहे.

3/5
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज ठाणे व नवी मुंबई परिसरातही पावसाचा जोर कायम राहील. दिवसभरात ढगाळ वातावरण राहील. तर तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. कमाल तापमान सुमारे 30 अंश, तर किमान तापमान 25 अंश सेल्सियस राहील.

4/5
आज मुंबई ठाण्याप्रमाणेच आज पालघर जिल्ह्यात देखील पावसाचा जोर कायम राहील. हवामान विभागाने आजही याठिकाणी यलो अलर्ट जारी केला आहे. मध्यम ते जोरदार पावसाच्या शक्यतेमुळे नागरिकांनी सावधगिरी बाळगावी. तापमान 29 अंश कमाल तर 24 अंश किमान असण्याचा अंदाज आहे.

5/5
कोकण किनारपट्टीवरील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना सलग तिसऱ्या दिवशी येलो अलर्ट दिला आहे. या भागांमध्ये आजही जोरदार पावसाच्या सरींचा अंदाज असून, काही भागात पाणी साचण्याची शक्यता आहे. तापमान 28 ते 30 अंश कमाल, तर 24 ते 25 अंश किमान राहू शकते.

OTT Series: ओटीटीवरची 8 एपिसोडची हॉरर-थ्रिलर सीरीज, पाहून अंगावर येईल काटा
ओटीटीवरची 8 एपिसोडची हॉरर-थ्रिलर सीरीज, पाहून अंगावर येईल काटा
    View All
    advertisement