Mumbai Rain: 15 ऑगस्टला पावसाचं तुफान, कोकणात अतिमुसळधार, ठाणे-मुंबईला दक्षतेचा इशारा

Last Updated:
Mumbai Rain: कोकण किनारपट्टीवर पावसाचा जोर वाढला आहे. आज मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे.
1/5
गेल्या दोन दिवसांपासून कोकण किनारपट्टीवर मुसळधार पावसाने जोर धरला आहे. काही ठिकाणी मुसळधार सरी, तर काही ठिकाणी रिमझिम पावसाचे वातावरण ओलं केलं आहे. आज, 15 ऑगस्ट रोजी, हवामान विभागाने विशेष इशारा दिला आहे. कोकणातील सिंधुदुर्ग, रायगड आणि रत्नागिरी या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जाहीर करण्यात आला असून, मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि पालघर या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.

advertisement
2/5
मुंबईतही गुरुवारी रात्रीपासून पावसाने जोरदार हजेरी लावली. आज सलग दुसऱ्या दिवशी मुंबईला यलो अलर्ट दिला गेला आहे. आज ढगाळ वातावरण आणि उकाडा यामुळे आर्द्रता जास्त राहील. कमाल तापमान सुमारे 30°C, किमान तापमान 27°C राहील. पावसामुळे मुंबईची वाहतूककोंडी मोठ्या प्रमाणात होतेच. गेले 2 दिवस नागरिकांना ट्रॅफिक आणि पावसाला सामोरं जावं लागतंय. त्यामुळे आजही काही ठिकाणी वाहतूक कोंडी किंवा लोकलच्या वेळापत्रकात उशीर होण्याची शक्यता आहे.

3/5
ठाणे आणि नवी मुंबई परिसरातही आज मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. यलो अलर्ट लागू असून काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. कमाल तापमान 29°C तर किमान तापमान 24°C असण्याचा अंदाज आहे. नागरिकांनी काही भागात पाणी साचण्याची शक्यता लक्षात घेऊन दक्षता घ्यावी.

4/5
पालघर जिल्ह्यात आज यलो अलर्ट आहे. पालघरमध्ये पावसाने मध्यरात्रीपासूनच जोरदार हजेरी लावली आहे. आज 15 ऑगस्ट 2025 रोजीही पाऊस मुसळधार हजेरी लावेल. आज कमाल तापमान 30°C, किमान तापमान 25°C राहील. समुद्रकिनारी भागात मच्छीमारांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

5/5
कोकणातील रायगड, रत्नागिर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याला आज ऑरेंज अलर्ट दिला आहे. जवळपास आठवडाभर पावसाची काही ठिकाणी जोरदार हजेरी होती. मात्र आज संपूर्ण जिल्ह्यांना हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट दिला आहे. या तीन जिल्ह्यांमध्ये आज मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे. काही भागांमध्ये नद्या व ओढ्यांच्या पाणीपातळीत वाढ होऊ शकते. कमाल तापमान 29–30°C, किमान तापमान 24–25°C राहील. समुद्र खवळलेला असल्याने मासेमारीसाठी जाण्यास बंदी घालण्यात आली आहे.

Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement