advertisement

आजचं हवामान: नारळी पौर्णिमेला वारं फिरलं, मुंबईत घामाच्या धारा, कोकणात कोणता इशारा?

Last Updated:
Mumbai Rain: कोकणातील हवामानात मोठे बदल जाणवत आहेत. आज नारळी पौर्णिमेपासून पावसाचा जोर ओसरणार आहे.
1/5
कोकणात गेल्या काही दिवसांत हवामानात मोठे बदल जाणवत आहेत. आज नारळी पौर्णिमेच्या दिवशी पावसाचा जोर काहीसा कमी राहणार आहे. रत्नागिरी वगळता कोकणातील कोणत्याही जिल्ह्याला आज सतर्कतेचा इशारे देण्यात आलेला नाही. आज पावसाचा जोर कमी असला तरी दमट हवामान आणि उन्हाळ्यामुळे उकाडा जाणवेल. विशेषतः मुंबईकरांना कडक उन्हाळा सामोरा जावं लागणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

2/5
मुंबईत आज दिवसभर ढगाळ वातावरण राहील, परंतु पावसाच्या सरी कमी प्रमाणात पडतील. हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस सकाळी आणि संध्याकाळी पडण्याची शक्यता आहे. कमाल तापमान 31 अंश सेल्सियसपर्यंत जाईल तर किमान तापमान 27 अंश राहील. दमट हवामानामुळे उकाडा अधिक जाणवेल.

3/5
नवी मुंबई आणि ठाणे या भागांत सुधा मुंबईसारखीच परिस्थिती आहे. आज अधूनमधून हलका ते मध्यम पाऊस पडेल. दुपारनंतर पावसाचा जोर कमी होईल आणि उकाडा जाणवेल. नवी मुंबईत कमाल तापमान 30 अंश व किमान तापमान 26 अंश असेल, तर ठाण्यात कमाल 30 अंश आणि किमान 25 अंश राहण्याची शक्यता आहे.

4/5
पालघर जिल्ह्यात आज हवामान ढगाळ राहील आणि दिवसभर हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळतील. सकाळी आणि दुपारच्या सुमारास थोडा पाऊस अपेक्षित असून संध्याकाळी काही भागात पावसाचा जोर कमी होईल. दमट हवामानामुळे उकाडा जाणवणार आहे. समुद्रकिनाऱ्याजवळच्या भागात आर्द्रता अधिक राहणार असल्याने उकाड्याचा त्रास जास्त जाणवेल.

5/5
कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांत आज हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार आहे. रत्नागिरीत कमाल तापमान 31 अंश व किमान 25 अंश, सिंधुदुर्गात कमाल 30 अंश व किमान 25 अंश, तर रायगडमध्ये कमाल 31 अंश व किमान 25 अंश राहील. हवामान खात्याने कोणताही विशेष अलर्ट जारी केलेला नाही.

SIM Cardमधून काढलं 26,55, 424 रुपयेचे सोनं; जुन्या सिम कार्डसाठी मार्केटमध्ये झुंबड उडाली, पण एका चुकीने जीवही जाऊ शकतो
SIM Cardमधून काढलं 26,55,424 रुपयेचे सोनं; जुन्या सिम कार्डसाठी झुंबड उडाली
  • जुन्या SIM कार्डमधून निघालं सोनं

  • SIM कार्डसाठी लोकांची झुंबड

  • पण एका चुकीने जीवही जाऊ शकतो

View All
advertisement