Mumbai Rain: सावधान! ताशी 50 किमी वेगाने वारे वाहणार, मुंबई, ठाण्याला झोडपणार, कोकणात हायअलर्ट
- Reported by:Namita Suryavanshi
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
Mumbai Rain: मुंबईसह कोकणात पावसाचा जोर वाढला आहे. वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटात मुसळधार पावसाचा अंदाज असल्याने नागरिकांना योग्य ती काळजी घ्यावी लागेल.
advertisement
मुंबईत आज विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यांची शक्यता असून हवामान विभागाने मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. आज ताशी 40 ते 50 किमी वेगाने वारे वाहणार असून मुंबईसह उपनगरांत यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे सार्वजनिक वाहतूक आणि दळणवळणावर याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. मुंबईकरांनी समुद्रकिनाऱ्याजवळ जाणं टाळावं आणि आवश्यक असल्यासच बाहेर पडावं, असं आवाहन करण्यात आलंय.
advertisement
advertisement
पालघर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस होण्याचा अंदाज आहे. यासोबतच 30 ते 40 किमी प्रतितास वेगाने सोसाट्याचा वारा येण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने पालघरसाठी देखील यलो अलर्ट जारी केला असून मासेमार, शेतकरी आणि खेड्यातील नागरिकांनी विशेष खबरदारी घ्यावी, असं आवाहन करण्यात आलं आहे.
advertisement
कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत हवामान विभागाने आज ऑरेंज अलर्ट दिला आहे. काही ठिकाणी मुसळधार ते अती मुसळधार पावसाची शक्यता आहे. विशेषतः घाटमाथ्यावर आणि नदीकाठच्या भागांमध्ये पाण्याची पातळी वाढण्याची शक्यता असून स्थानिक प्रशासनाने सतर्कता बाळगण्याचे निर्देश दिले आहेत. नागरिकांनी गरजेचे सामान जवळ ठेवावे आणि आवश्यक असल्यास सुरक्षित स्थळी स्थलांतर करावं.









