भारतातील सगळ्यात स्वस्त घरं! किंमत फक्त अडीच लाख रुपये, आहे कुठे पटापट पाहा
- Published by:Priya Lad
Last Updated:
Low Price House : स्वतःचं घर घेऊ पाहणाऱ्यांचं स्वप्न आता लवकरच पूर्ण होणार आहे. कारण देशातील पहिलं इकोफ्रेंडली घर साकारलं आहे, ज्याची किंमत फक्त अडीच लाख रुपये आहे.
advertisement
advertisement
advertisement
हे घर इंटरलॉकिंग वॉल ब्लॉक्स औद्योगिक क्षेत्रांमधून येणाऱ्या राखेपासून बनवलं गेलंय, सोप्या भाषेत तुम्ही त्याला विटा म्हणू शकता. या ब्लॉक्सचं वैशिष्ट्य म्हणजे जेव्हा ते रचले जातात तेव्हा ते कुलुपासारखे एकत्र येतात. ज्यामुळे सिमेंट, प्लास्टरची गरज नाही. राखेपासून बनवलेले हे इंटरलॉकिंग वॉल ब्लॉक्स इतके मजबूत आहेत की ते वादळ, चक्रीवादळे आणि भूकंप सहन करू शकतात. हे घर तुम्हाला उन्हाळ्यात थंड आणि हिवाळ्यात उबदार ठेवेल, ज्यामुळे एअर कंडिशनरची गरज राहणार नाही.
advertisement








