बापरे बाप! गाडीची एक नंबर प्लेट, 11700000 रुपये, असं काय आहे यात खास?
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
सोनीपतच्या कुंडली येथील HR88B8888 या व्हीआयपी नंबर प्लेटसाठी १.१७ कोटींची विक्रमी बोली लागली असून, भारतातील सर्वात महागडी नंबर प्लेट ठरली आहे.
बापरे! बाप, एक गाडी किंवा घर येईल इतक्या पैशांमध्ये फक्त एक नंबर प्लेट घेतली आहे. एका व्यक्तीनं नंबरप्लेटसाठी चक्क कोट्यवधी रुपये मोजले आहेत. या व्यक्तीची सध्या सोशल मीडियावर तुफान चर्चा होत आहे. भारतातील ऐतिहासिक क्षण मानला जात आहे. पहिल्यांदाच सगळे विक्रम मोडून १.१७ कोटींना नंबर प्लेट विकली गेली आहे.
advertisement
वाहनांच्या व्हीआयपी (VIP) नोंदणी क्रमांकाच्या ऑनलाईन लिलावादरम्यान फॅन्सी नंबरने नवा इतिहास रचला आहे. सोनीपत जिल्ह्यातील कुंडली येथील 'HR88B8888' या क्रमांकासाठी तब्बल १ कोटी १७ लाख रुपयांची विक्रमी बोली लागली. हा आकडा पाहता, हा आतापर्यंतचा देशातील सर्वात महागडा व्हीआयपी नंबर ठरण्याची शक्यता आहे.
advertisement
advertisement
ज्या व्यक्तीने ही विक्रमी बोली लावली आहे, त्या व्यक्तीला पुढील ५ दिवसांच्या आत ही संपूर्ण रक्कम जमा करावी लागेल. रक्कम भरल्यानंतरच हा क्रमांक त्या व्यक्तीसाठी निश्चित केला जाईल. हा फॅन्सी व्हीआयपी क्रमांक सोनीपतच्या कुंडली क्षेत्रातील असून, नोंदणीनंतर वाहनाचे रजिस्ट्रेशनही याच ठिकाणी केले जाईल. या क्रमांकामध्ये चार वेळा ८ हा अंक आल्यामुळे याला विशेष महत्त्व आहे.
advertisement
advertisement
ही विक्रमी बोली लावणाऱ्या व्यक्तीची ओळख समोर आलेली नाही, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. नियमांनुसार, लिलाव प्रक्रिया संपल्यानंतरच ओळख उघड करण्याची औपचारिक प्रक्रिया सुरू केली जाते. जर बोली लावणाऱ्या व्यक्तीने वेळेत ही रक्कम जमा केली नाही, तर हा व्हीआयपी नंबर पुन्हा एकदा लिलावासाठी उपलब्ध केला जाईल.
advertisement
सोनीपतच्या अधिकाऱ्यांकडून असा दावा केला जात आहे की, आतापर्यंत संपूर्ण भारतात कोणत्याही व्हीआयपी नंबरवर इतकी मोठी बोली लागलेली नाही. यापूर्वीही हरियाणाच्या काही जिल्ह्यांमध्ये महागड्या बोली लागल्याचे प्रकार समोर आले होते, पण सोनीपतच्या या एकाच क्रमांकाने त्या सर्व विक्रमांना मागे टाकले आहे. ०००१, ९९९९, ७७७७ आणि ८८८८ यांसारख्या फॅन्सी क्रमांकांना वाहनांच्या बाजारात सतत वाढती मागणी आहे.


