एकनाथ शिंदेच पुन्हा एकदा मुख्यमंत्री व्हावेत, अयोध्येतही लागले बॅनर, राम मंदिराचे मुख्य पुजाऱ्यांनी केलं महत्त्वाचं भाष्य
- Published by:Khushalkant Dusane
- local18
Last Updated:
महाराष्ट्रात विधासभेच्या निवडणुकीनंतर महायुतीला प्रचंड यश मिळाले आहे. मात्र, मुख्यमंत्रीपदावरुन अद्यापही रस्सीखेच सुरू आहे. महायुतीच्या सरकारमध्ये अडीच वर्षे एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री राहिले. यानंतर आता भाजपच्या वतीने देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री होतील, असे सांगितले जात आहे. तर दुसरीकडे शिवसेनेकडून एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्रीपदासाठी दावेदार असल्याचे म्हटले जात आहे. शिवसेनेने मुख्यमंत्रीपदावर दावा केल्याने निकाल लागून अद्याप 4 दिवस झाले तरीही मुख्यमंत्री पदावरचा तिढा अद्याप सुटलेला नाही. यातच आता अध्योध्येतही मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेच व्हावेत, यासाठी पोस्टर्स लागले आहे. (सर्वेश श्रीवास्तव/अयोध्या, प्रतिनिधी)
महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुकीनंतर एकनाथ शिंदे यांना पुन्हा मुख्यमंत्री करण्यात यावेत, यासाठी अध्योध्येत बॅनर लावण्यात आले होते. महाराष्ट्रात पुन्हा एकदा शिंदे सरकार स्थापन व्हावे, हा संदेश जनतेला दिला जायला हवा यासाठी एकनाथ शिंदे यांच्या समर्थनार्थ अयोध्येतील अनेक चौकात बॅनर आणि पोस्टर्स लावण्यात आले आहेत. या बॅनर्सचे साधु संतांनीही समर्थन केले आहे.
advertisement
advertisement
advertisement
राम मंदिराचे मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्र दास यांनी एकनाथ शिंदे यांचे समर्थन केले. ते म्हणाले, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे एकनाथ शिंदेच व्हावेत, कारण त्यांनी गौरक्षणासाठी चांगले काम केले आहे. ते एक हिंदूवादी नेते आहेत. जर अयोध्येच्या लोकांना ते मुख्यमंत्री व्हावेत, असे वाटत असेल आम्हीही याचे समर्थन करू.
advertisement