Shahu Maharaj Jayanti 2024: छत्रपती शाहू महाराजांचं मूळ नाव काय होतं? त्यांना शाहू नाव कोणी दिलं?
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Shahu Maharaj Jayanti 2024: छत्रपती शाहू महाराजांची आज (26 जून 2024) जयंती साजरी होत आहे. राजर्षी शाहू महाराज हे खरे लोकशाहीवादी आणि समाजसुधारक मानले जातात. शाहू महाराज हे एक सक्षम राज्यकर्ते होते. त्यांच्या राजवटीत शाहू महाराजांनी अनेक पुरोगामी धोरणे यशस्वीपणे राबवली.
advertisement
ब्रिटिश राजसत्तेच्या काळामध्ये सामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी व बहुजन समाजाच्या सामाजिक उन्नतीसाठी या काळात शाहू राजांनी प्रयत्न केले, सामाजिक परिवर्तनाला गती प्राप्त करून दिली, तसेच सनातनी वर्गाच्या विरोधाला न जुमानता दलित (अस्पृश्य) व मागासवर्गीय समाजाच्या विकासासाठी महत्त्वाची भूमिका बजावली.
advertisement
advertisement
शाहू महाराजांचा जन्म 26 जून इ.स. 1874 रोजी कागल येथील घाटगे घराण्यात झाला. त्यांचे मूळ नाव यशवंत होते, त्यांच्या वडिलांचे नाव जयसिंगराव (आप्पासाहेब) तर आईचे नाव राधाबाई होते. कोल्हापूर संस्थानाचे राजे चौथे शिवाजी महाराज यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्नी आनंदीबाई यांनी 17 मार्च 1884 रोजी यशवंतरावांना दत्तक घेतले व 'शाहू' हे नाव ठेवले.
advertisement
सन 1889 ते 1893 या चार वर्षांच्या कालखंडात धारवाड येथे शाहू महाराजांचा शैक्षणिक आणि शारीरिक विकास झाला. शिक्षण चालू असतानाच 01 एप्रिल 1891 रोजी बडोद्याच्या गुणाजीराव खानविलकर यांच्या लक्ष्मीबाई या मुलीशी शाहू विवाहबद्ध झाले. या वेळी त्यांचे वय 17 वर्षांचे होते आणि लक्ष्मीबाईंचे वय 12 वर्षांहून कमी होते.
advertisement









