Ganesh Chaturthi 2025: गौरी-गणपती सजावटीसाठी साहित्य हवंय? मुंबईतील सगळ्यात स्वस्त 5 ठिकाणं

Last Updated:
Ganesh Chaturthi 2025: गौरीगणपतीचं आगमन अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलं असून घराघरांत सजावट आणि इतर तयारीची लगबग सुरू आहे. यंदा घरी पारंपरिक आणि आकर्षक सजावट करायची असेल तर मुंबईतील काही मार्केटमध्ये स्वस्तात मस्त साहित्य मिळू शकतं. या ठिकाणी तुम्हाला मखर, हार, फुलं, लाइट्स, ज्वेलरी यांसारखं सर्व साहित्य मिळेल.
1/5
कीर्तीकर मार्केट: दादर वेस्टला असलेलं कीर्तीकर मार्केट म्हणजे सजावटीच्या साहित्याचा खजिनाच आहे. इथे तुम्हाला पारंपरिक पद्धतीने तयार केलेले हार, माळा, मखर आणि विविध रंगीबेरंगी सजावटीचं साहित्य अगदी स्वस्त दरात मिळतं. हे ठिकाण गणपती मंडळांपासून ते घरगुती गणपती सजावटीसाठी अनेकांची पहिली पसंती आहे.

advertisement
2/5
क्रॉफर्ड मार्केट: मुंबईच्या मध्यवर्ती भागात असलेलं क्रॉफर्ड मार्केट विविध प्रकारच्या वस्तूंसाठी ओळखलं जातं. गणेशोत्सवात इथे खरेदीसाठी विशेष गर्दी पाहायला मिळते. कृत्रिम फुलं, हार, तयार ज्वेलरी सेट्स, डेकोरेटिव्ह आयटम्स आणि आकर्षक शोपीससाठी हे ठिकाण प्रसिद्ध आहे. व्यापारी व घरगुती ग्राहकांसाठी ठिकाण हॉटस्पॉट ठरतं.

3/5
रानडे रोड मार्केट: दादरच्या रानडे रोडवरील बाजारपेठा सजावटीच्या साहित्यासाठी प्रसिद्ध आहे. येथे तुम्हाला नैसर्गिक फुलांच्या माळा, पारंपरिक आणि सणावारासाठी साजेशी ज्वेलरी सहज मिळते. सध्या संपूर्ण मार्केटमध्ये गणेशोत्सवासाठी लागणारं साहित्य विक्रीसाठी उपलब्ध आहे. बजेटमध्ये दर्जेदार सजावटीचं साहित्य हवं असल्यास, हे ठिकाण उत्तम पर्याय आहे.

4/5
विलेपार्ले मार्केट: विलेपार्ले स्टेशनजवळचं हे मार्केट हल्ली खूप प्रसिद्ध झालं आहे. रेडीमेड थीम डेकोरेशन, थर्मोकॉल कटआउट्स, फुलं, झेंडू आणि मोगऱ्याचे हार, आणि हाताने बनवलेले डिझाईन पॅटर्न्स या मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. ग्राहकांना कमी वेळात आणि कमी किमतीत साहित्य हवं असल्यास हे ठिकाण उत्तम पर्याय आहे.

5/5
सांताक्रूझ मार्केट: सांताक्रूझ रेल्वे स्टेशनच्या पश्चिम बाजूला असलेली ही बाजारपेठ लाइटिंग, पारंपरिक फॅब्रिक्स आणि आकर्षक सजावटीच्या वस्तूंसाठी ओळखली जाते. विशेष म्हणजे, गौरी गणपतीच्या पारंपरिक सजावटीसाठी लागणारी वस्त्रं आणि हँडमेड डेकोरेटिव्ह्स येथे सहजपणे आणि स्वस्त दरात उपलब्ध असतात.

Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement