Pune : रविवारची सुट्टी अन् मुसळधार पाऊस, इंद्रायणीच्या पुलावर मृत्यूशी भेट, घटनास्थळाचे Photo

Last Updated:
पुणे जिल्ह्याच्या मावळ तालुक्यात पुल पडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. तळेगाव दाभाडे शहराजवळील प्रसिद्ध पर्यटनस्थळ कुंडमळा येथे इंद्रायणी नदीवर असलेला जूना पूल कोसळून हा अपघात झाला आहे.
1/7
इंद्रायणी नदीवर असलेला हा पूल कोसळून 2 जणांचा मृत्यू झाला आहे, तर काही जण वाहून गेल्याची माहिती समोर आली आहे.

advertisement
2/7
रविवार असल्यामुळे इंद्रायणीच्या पुलावर पर्यटकांची मोठी गर्दी होती, त्यामुळे पूल कोसळल्यानंतर काही पर्यटक इंद्रायणी नदीत बुडाल्याची भीती आहे.

3/7
घटनेची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक पोलीस, ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली असून बचावकार्य सुरु आहे. दोन दिवसांपासून मावळ परिसरात मुसळधार पाऊस कोसळत असल्यामुळे इंद्रायणीच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. यामुळे नदीत पडलेल्या पर्यटकांना वाचविण्याचे शर्तीचे प्रयत्न यंत्रणांकडून सुरू आहेत.

4/7
इंद्रायणी नदीवरील पूल वाहून गेल्याने 20 ते 25 पर्यटकही वाहून गेल्याची माहिती समोर आली आहे. मावळजवळील तळेगाव दाभाडेनजीक कुंभमेळ्याजवळ हा पूल आहे. पिंपरी-चिंचवडसह पुण्यातील पर्यटकांचे आकर्षण असलेल्या या कुंडमळ्यावर रविवार असल्यामुळे आज पर्यटकांची तोबा गर्दी होती.

5/7
बराच जुना असल्यामुळे हा पूल जीर्ण झाला होता, तसंच मागच्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे पूल खचलाही होता. यानंतर आज दुपारच्या सुमारास हा पूल कोसळला.

6/7
'आमच्या डिफेन्सच्या अखत्यारित हा पूल येतो. पादचारी पूल असल्याने केवळ पर्यटकांना या बाजूने पलीकडील बाजूस जाण्यासाठी पुलाचा वापर व्हायचा. बंधने असतानाही काहीवेळा दुचाकी देखील पुलावरून जायच्या. परंतु पूल अतिशय कमकुवत होता. त्यातूनच ही घटना घडली आहे. मदतकार्य सुरू असून एनडीआरएफसह वेगवेगळ्या टीम्स घटनास्थळी पोहोचल्या आहेत', अशी माहिती आमदार सुनिल शेळके यांनी दिली आहे.

7/7
पावसाळ्याला सुरुवात झाली की हजारो पर्यटकांची पावले वर्षाविहारासाठी मावळ तालुक्यातील अनेक प्रसिद्ध पर्यटनस्थळांकडे वळतात. आज रविवारी सुट्टीच्या दिवशी प्रसिद्ध कुंडमळ्याला पर्यटकांनी गर्दी केली होती. येथीलच इंद्रायणी नदीवरील पुलावरून पर्यटक जात असताना पूल अचानक खचला, खाली कोसळला.

Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement