Weather Alert: पश्चिम महाराष्ट्रात हवापालट, थंडी नव्हे पुन्हा अवकाळी संकट, या जिल्ह्यांना अलर्ट

Last Updated:
Weather Alert: पश्चिम महाराष्ट्रातील हवामानात मोठे बदल जाणवत आहेत. आज कोल्हापूरसह काही जिल्ह्यांना पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
1/7
महाराष्ट्रात उत्तरेकडील शीतलहरींमुळे निर्माण झालेली थंडीची लाट ओसरत आहे. यातच राज्याच्या दक्षिणेकडील भागात हवामानात मोठे बदल जाणवत आहेत. नोव्हेंबर अखेर पुन्हा अवकाळी संकट घोंघावत असून हवामान विभागाने कोकणासह पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना पावसाचा इशारा दिला आहे. आज 23 नोव्हेंबर रोजीचा पश्चिम महाराष्ट्रातील हवामान अंदाज जाणून घेऊ.

advertisement
2/7
पुणे जिल्ह्यात थंडीचा कडाका अंशत: कमी झाला असून शनिवारी 33.4 कमाल आणि 14.4 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. आज कमाल तापमान 32 अंशांवर तर किमान तापमान 16 अंशांवर राहील. पुण्यासह घाटमाथ्याच्या भागात पावसाची कोणतीही शक्यता नाही.

3/7
साताऱ्यातील गारठा काहीसा कमी झाला आहे. शनिवारी साताऱ्यातील कमाल तापमान 33.7 अंश तर किमान 16 अंशांवर राहिले. आज साताऱ्यातील हवामानात मोठे बदल जाणवत असून किमान तापमानात वाढ तर कमाल तापमान घटण्याची शक्यता आहे. पुढील 24 तास जिल्ह्यातील काही भागात गडगडाटी पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

4/7
कोल्हापूर जिल्ह्यात आज वातावरणातील थंडी गायब होवून कमाल तापमानाचा पारा 30.3 अंशावर राहील. तसेच किमान तापमानात वाढ होऊन ते 19.4 अंशापर्यंत राहील. पुढील तीन दिवस गारठा कमी राहणार असून तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे.

5/7
सोलापूर जिल्ह्यात शनिवारी कमाल तापमान 34.2 अंश तर किमान 19 अंशावर राहिले. सोलापुरात देखील कमाल तापमानात घट होणार असून किमान तापमान वाढणार आहे. त्यामुळे थंडीचा जोर काहीसा कमी होईल.

6/7
सांगली जिल्ह्यात गेल्या 24 तासांत हवामानात मोठे बदल जाणवत आहेत. आज थंडीची तीव्रता कमी झाली असून किमान तापमान 20 तर कमाल 32 अंशांवर राहील. तसेच पुढील 48 तास काही भागात गडगडाटी पावसाची शक्यता आहे.

7/7
सध्या दक्षिण भारतासह, मध्य महाराष्ट्राच्या दक्षिणेकडील जिल्ह्यात पावसाला पोषक हवामान झाले असून आकाश ढगाळ होत आहे. आज 23 नोव्हेंबर रोजी राज्यात गारठा कमी होणार असून ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सातारा, सांगली कोल्हापूर जिल्ह्यांत ढगाळ आकाश, विजांसह हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement