Weather Alert: स्वेटर काढा अन् रेनकोट घाला! पश्चिम महाराष्ट्रात अचानक बदलली हवा, शनिवारी पाऊस

Last Updated:
Weather Alert: पश्चिम महाराष्ट्रातील हवामानात वीकेंडला मोठे बदल जाणवत आहेत. पुढील 2-3 दिवस कोल्हापूरसह काही जिल्ह्यांत पावसाची शक्यता आहे.
1/7
उत्तरेकडील थंड वाऱ्यांमुळे महाराष्ट्रात आलेली थंडीची लाट काहीप्रमाणात कमी झाली आहे. यातच राज्याच्या दक्षिणेकडील भागात ढगाळ आकाशासह पावसाला पोषक हवामान होत आहे. आज 22 नोव्हेंबर रोजी गारठा कायम राहण्याचा तसेच सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली जिल्ह्यात विजांसह हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

advertisement
2/7
पुणे जिल्ह्यात थंडीचा कडाका अंशत: कमी झाला असून शुक्रवारी 30.4 कमाल आणि 11 अंश सेल्सिअस किमान तापमानाचा पारा नोंदविण्यात आला. आज पुणे जिल्ह्यात सायंकाळी आकाश ढगाळ होईल. कमाल तापमान 30 अंशापर्यंत राहील. तसेच किमान तापमानात वाढ पारा 13 अंश सेल्सिअस राहील.

3/7
साताऱ्यातील गारठा काहीसा कमी झाला आहे. शुक्रवारी साताऱ्यातील कमाल तापमानाचा पारा 31.7 अंशावर राहिला. तर 13.4 अंश सेल्सिअस किमान तापमान राहिले. आज सातारा जिल्ह्यात किमान आणि कमाल तापमान 16 ते 31 अंश सेल्सिअस दरम्यान राहील. रविवारी या भागात विजांसह पावसाची शक्यता आहे.

4/7
कोल्हापूर जिल्ह्यात आज ढगांच्या गडगडाटासह हलक्या पावसाची शक्यता भारतीय हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. आज वातावरणातील थंडी गायब होवून कमाल तापमानाचा पारा 32 अंशावर राहिल. तसेच किमान तापमान 21 अंशांवर राहील.

5/7
सोलापूर जिल्ह्यात शुक्रवारी कमाल 34.3 तर किमान 17.1 तापमानाची नोंद झाली. आज किमान तापमानात वाढ होऊन ते 19 अंशांवर जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे थंडीचा जोर कमी राहील.

6/7
सांगली जिल्ह्यात मागील 24 तासात 15.8 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. आज जिल्ह्यात कमाल तापमान 32 अंशावर राहील. तसेच किमान तापमानात वाढ होऊन ते 18 अंशावर राहील. सांगलीत आज ढगांच्या गडगडाटासह हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

7/7
लक्षद्वीप बेटे आणि मालदीव परिसरावर कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय असून, त्याला लागून समुद्र सपाटीपासून 4.5 किलोमीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत आहेत. यातच आग्नेय बंगालच्या उपसागरात कमी दाब क्षेत्राची निर्मिती झाली असून, या प्रणालीची तीव्रता वाढणार आहे. या प्रणालींमुळे दक्षिण भारतात पावसाचा जोर वाढणार आहे. तसेच  सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांत विजांसह पावसाची शक्यता आहे.

Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement