Weather Forecast: मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस! पुणे, साताऱ्याला अलर्ट, पुढील 24 तासांचा हवामान अंदाज
- Published by:Shankar Pawar
 - Reported by:Priti Nikam
 
Last Updated:
Pune Rain: पश्चिम महाराष्ट्रातील काही भागात जोरदार पाऊस सुरू आहे. पुणे, साताऱ्यासह कोल्हापुरातील काही भागात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. 
advertisement
 गेल्या काही काळात पुणे जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर कमी झाला होता. मात्र हवापालट होवून पुढील 24 तासात शिवाजीनगर परिसरात मुसळधार ते खूप मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तसेच तापमान 31 अंशावर पोहचण्याचा अंदाज आहे. पुणे जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर देखील जोरदार पावसाची शक्यता असल्याने दक्षतेचा ऑरेंज अलर्ट हवामान विभागाने दिला आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement


