Weather Alert: दिवाळीत विजांचे फटाके, पश्चिम महाराष्ट्रात पाऊस, कोल्हापूरसह या जिल्ह्यांना अलर्ट

Last Updated:
Weather Alert: पश्चिम महाराष्ट्रातील हवामानात सातत्याने बदल जाणवत आहेत. ऐन दिवाळीत पावसाची शक्यता असून 2 जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी केला आहे.
1/7
राज्यात 'ऑक्टोबर हीट’चा चटका कायम आहे. ढगाळ हवामानामुळे उकाडा वाढून पावसाला पोषक हवामान होत आहे. आज 21 ऑक्टोबर रोजी राज्यात काही ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा दिला आहे. पश्चिम महाराष्ट्रातील लक्ष्मीपूजन दिवशीचा हवामान अंदाज जाणून घेऊ.

advertisement
2/7
पुणे जिल्ह्यात सोमवारी 32.6 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. आज पुणे जिल्ह्यात विजांसह पावसाचा यलो अलर्ट हवामान विभागाने दिला आहे. यावेळी कमाल तापमानाचा पारा 32 अंशावर राहील. कमाल तापमानात अंशत: वाढ होऊन विजांसह पावसाची शक्यता आहे.

3/7
मागील 24 तासात सातारा जिल्ह्यातील कमाल तापमान 33.2 अंश सेल्सिअस इतके राहीले. आज संपूर्ण साताऱ्याच्या घाटमाथ्यावर विजांसह पावसाची शक्यता असल्याने दक्षतेचा यलो अलर्ट भारतीय हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. यावेळी कमाल तापमानाचा पारा 32 अंशावर राहील.

4/7
कोल्हापूर जिल्ह्यात काल सोमवार 31.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. पुढील 24 तासात कोल्हापूरसह घाटमाथ्यावर विजांसह पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. यावेळी कमाल तापमान 32 अंश सेल्सिअस इतके राहील.

5/7
सोमवारी सोलापूर जिल्ह्यात 34.9 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. यावेळी कमाल तापमान 35 अंशावर राहिल. आज जिल्ह्यात ढगांच्या गडगडाटासह हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यावेळी पारा 35 अंशावर राहण्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.

6/7
सांगली जिल्ह्यात मागील 24 तासात 32.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. आज जिल्ह्यात विजांसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यावेळी पारा 33 अंशावर राहण्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.

7/7
आज संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रात विजांसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच उर्वरित राज्यात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. कमाल तापमान 32 अंशापार राहत असून पश्चिम महाराष्ट्रात विजांसह पावसाला पोषक हवामान असले तरिही तापमानात वाढ कायम आहे.

OTT Movie: बोल्ड सीन्सने भरलेला सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका; 2 तास 28 मिनिटांची कहाणी ओटीटीवर हिट
2 तास 28 मिनिटांचा बोल्ड सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका
    View All
    advertisement