Weather Alert: सोसाट्याचा वारा, विजांचा कडकडाट अन् मुसळधार पाऊस, रविवारी पश्चिम महाराष्ट्राला अलर्ट
- Reported by:Priti Nikam
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
Weather Alert: पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढला आहे. पुढील 24 तासांसाठी हवामान विभागाने जोरदार पावसाचा इशारा दिला आहे.
राज्यात उन्हाचा चटका आणि उकाडा तापदायक ठरत असतानाच, पावसाच्या हजेरीने काहीसा थंडावा मिळाला आहे. आज 10 ऑगस्ट रोजी पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि पूर्व विदर्भात विजांसह पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा आहे. उर्वरित राज्यात आकाश ढगाळ राहून विजांसह हलक्या सरींचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
advertisement
advertisement
advertisement
कोल्हापूर जिल्ह्यात मागील 24 तासात 0.7 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. यावेळी कमाल तापमान 27.6 अंश सेल्सिअस राहिले. पुढील 24 तासात कमाल तापमान 27 अंशावर राहिल. जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह ताशी 30 ते 40 किलोमीटर जोरदार वारे आणि मध्यम पावसाची शक्यता आहे. पुढील 24 तास कोल्हापूर जिल्हास सतर्कतेचा अलर्ट आयएमडीने जारी केला आहे.
advertisement
advertisement
advertisement








