Weather Alert: पश्चिम महाराष्ट्रात पुन्हा धो धो कोसळणार, कोल्हापूर ते पुणे 24 तास पावसाचे, आजचा हवामान अंदाज
- Reported by:Priti Nikam
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
Weather Alert: पश्चिम महाराष्ट्रातील घाट भागात पावसाचा जोर कायम आहे. आज पुन्हा हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.
गेल्या काही दिवसांत राज्यात मान्सूनचा जोर वाढला होता. आता मात्र पावसाची तीव्रता काही प्रमाणात कमी होणार आहे. आज 27 जुलै रोजी कोकण, घाटमाथा, विदर्भात जोरदार पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. रायगडसह पुणे आणि साताऱ्याच्या घाटमाथ्यावर जोरदार पावसाची शक्यता असल्याने दक्षतेचा ऑरेंज अलर्ट हवामान विभागाने दिला आहे.
advertisement
मागील 24 तासात पुणे जिल्ह्यात 13.1 मिलीमीटर पाऊस नोंदविण्यात आला. यावेळी कमाल तापमानाचा पारा 26.6 अंश सेल्सिअसवर होता. पुढील 24 तासात पुणे घाटमाथ्यावर जोरदार पावसाची शक्यता असल्याने दक्षतेचा ऑरेंज अलर्ट हवामान विभागाने दिला आहे. तसेच उर्वरित पुणे जिल्ह्यात मध्यम पावसाचा अंदाज आहे. आज कमाल तापमान 26 तर किमान तापमान 22 अंश सेल्सिअस इतके राहील.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement









