Weather Alert: काळे ढग दाटणार, धो धो कोसळणार, कोल्हापूर ते पुणे ऑरेंज अलर्ट, आजचा हवामान अंदाज
- Reported by:Priti Nikam
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
Weather Alert: पश्चिम महाराष्ट्रातील घाट भागात जोरदार पाऊस सुरू आहे. आज पुन्हा 3 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिला आहे.
कोकण, घाटमाथ्यावर संततधार पाऊस कोसळत आहे. पुढील 48 तासात घाटमाथ्यावरील पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. मध्य महाराष्ट्राच्या घाटाकडील भागात पावसाची तीव्रता कायम आहे. आज 3 जुलै रोजी घाट माथ्यावरील परिसरात जोरदार पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा ऑरेंज अलर्ट हवामान विभागाने दिला आहे.
advertisement
advertisement
सातारा परिसरात गेल्या 24 तासात 3 मिलीमीटर पाऊस नोंदविण्यात आला. कमाल तापमान 26.3 अंश सेल्सिअस राहिले. पुढील 24 तासात कमाल तापमान 27 अंशावर राहील. ढगाळ आकाशासह हलक्या पावसाचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे. सातारा जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर जोरदार पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.
advertisement
advertisement
advertisement
राज्यभरामध्ये पावसाचा जोर वाढत असताना पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यात मात्र पारा तापला आहे. मागील 24 तासात जळगावसह सोलापूर जिल्ह्यात राज्यातील उच्च 32 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. मागील 24 तासात 1 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. पुढील 24 तासात हलक्या पावसाची शक्यता आहे. यावेळी पारा 31 अंशांवर राहील.
advertisement








