Weather Alert : राज्यात मुसळधार पावसाचा जोर कायम, 21 जिल्ह्यांसाठी महत्त्वाचा अलर्ट
- Reported by:Pragati Bahurupi
- Published by:Mohan Najan
Last Updated:
28 मे रोजीही राज्यातील काही जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज आणि यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबईसह कोकण परिसरात जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.
advertisement
advertisement
कोकणासह पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भातील काही जिल्ह्यांना हवामान विभागाकडून 28 मे साठी पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यात रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा घाटमाथा, भंडारा, चंद्रपूर,गोंदिया , नागपूर या जिल्ह्यांचा समावेश आहे. कोकणसह मुंबईत सुद्धा 28 मे रोजी सामान्यतः ढगाळ आकाश राहून जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.
advertisement
ठाणे आणि मुंबई या दोन्ही ठिकाणी पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. पुण्यात सामान्यतः ढगाळ आकाश राहून मध्यम पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पुणे घाटमाथा आणि कोल्हापूर घाटमाथा या दोन्ही ठिकाणासाठी पावसाचा यलो अलर्ट हवामान विभागाकडून जारी करण्यात आला आहे. मराठवाड्यातील प्रमुख शहर असलेल्या छ्त्रपती संभाजीनगरमध्ये अंशतः ढगाळ आकाश राहून वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
advertisement
छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर या सर्व जिल्ह्यांना 28 मे साठी पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. उत्तर महाराष्ट्रातील प्रमुख शहर असलेल्या नाशिकमध्ये सामान्यतः ढगाळ आकाश राहून मध्यम पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. धुळे, नंदुरबार, जळगाव या तिन्ही जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
advertisement
विदर्भातील प्रमुख शहर असलेल्या नागपूरमध्ये सामान्यतः ढगाळ आकाश राहून जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. अकोला, अमरावती, बुलढाणा, गडचिरोली, वर्धा, वाशिम, यवतमाळ विदर्भातील या सर्व जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्याचबरोबर राज्यातील उर्वरित जिल्ह्यांत हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.
advertisement
राज्यात सर्वत्र पावसाचे वातावरण असल्याने नागरिकांनी सतर्कता बाळगणे गरजेचे आहे. पाऊस आणि वादळ सुरु असताना झाडाखाली थांबू नये. वादळी वातावरण निर्माण होत असताना सुरक्षित ठिकाणी आसरा घ्यावा, असे आवाहन प्रशासनाकडून वारंवार करण्यात येत आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांनी सुद्धा पेरणीची घाई करू नये. शेतातील पिकांची योग्य ती काळजी घ्यावी, असे कृषी विभागाकडून सांगण्यात येत आहे.









