advertisement

Weather Alert: मंगळवारी राज्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता, 12 जिल्ह्यांना अलर्ट

Last Updated:
तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.पाहुयात 5 ऑगस्ट रोजी राज्यातील हवामानाची स्थिती कशी राहील.
1/7
5 ऑगस्ट रोजी राज्यातील पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या भागातील काही जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच कोकण आणि उत्तर महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यांत हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. पाहुयात 5 ऑगस्ट रोजी राज्यातील हवामानाची स्थिती कशी राहील.

2/7
मुंबईत ढगांच्या गडगडाटासह हलक्या पावसाची शक्यता आहे. मुंबईसह ठाणे आणि पालघर जिल्ह्यातही हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग याठिकाणी ढगांच्या गडगडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

3/7
पश्चिम महाराष्ट्रातील प्रमुख शहर असलेल्या पुणे येथे ढगांच्या गडगडाटासह हलक्या पावसाची शक्यता आहे. तसेच पश्चिम महाराष्ट्रातील घाटमाथा परिसरात ढगांच्या गडगडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो. तसेच कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यांत ढगांच्या गडगडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. सांगली आणि सोलापूर जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह आणि वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या दोन जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

4/7
मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड या जिल्ह्यांत ढगांच्या गडगडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. तर परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर आणि धाराशिव या सर्व जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह आणि वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. या पाचही जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

5/7
उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव आणि अहिल्यानगर जिल्ह्यांत हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. या जिल्ह्यांना कोणताही अलर्ट जारी करण्यात आलेला नाही.

6/7
विदर्भातील नागपूरमध्ये विजांच्या कडकडाटासह आणि वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा आणि यवतमाळ या जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह आणि वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. नागपूरसह या चार जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, गोंदिया, वाशिम या सर्व जिल्ह्यांत कुठलीही पावसाची शक्यता नाही.

7/7
पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. त्या जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्टही जारी करण्यात आला आहे. या भागातील नागरिकांनी काळजी घ्यावी. तसेच शेतकऱ्यांनी देखील हवामाचा अंदाज घेऊनच शेतीची कामे करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

Shiv Sena UBT On KDMC : कल्याण-डोंबिवलीत शिंदे गटासोबत जाणार? मातोश्रीवरील बैठकीनंतर ठाकरे गटाने आपले पत्ते उघडले....
कल्याण-डोंबिवलीत शिंदे गटासोबत जाणार? मातोश्रीवरील बैठकीनंतर ठाकरे गटाने आपले पत
  • कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या (KDMC) सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग

  • शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने आपली भूमिका स्पष्ट केली

  • ठाकरे गट कोणती भूमिका घेणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते.

View All
advertisement