Weather Alert: राज्यात रविवारी मुसळधार पाऊस, 7 जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी
- Reported by:Pragati Bahurupi
- Published by:Mohan Najan
Last Updated:
1 जून रोजी राज्यातील विविध भागांत पावसाची शक्यता आहे. कोकण आणि विदर्भातील काही जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. इतर उर्वरित भागांत हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.
राज्यात संपूर्ण मे महिन्यात पावसाचे वातावरण बघायला मिळाले. आता मे महिन्याच्या तुलनेत जून महिन्याच्या सुरवातीला राज्यातील पावसाचा जोर काहीसा कमी होणार असल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे. 1 जून रोजी राज्यातील विविध भागांत पावसाची शक्यता आहे. कोकण आणि विदर्भातील काही जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. इतर उर्वरित भागांत हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. कोकण आणि विदर्भातील काही जिल्हे वगळता राज्यात कुठेही पावसाचा कोणताही अलर्ट जारी करण्यात आलेला नाही. पाहुयात, पुढील 24 तासांत राज्यातील हवामानाची स्थिती कशी राहील.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
अमरावती, गडचिरोली, वर्धा, यवतमाळ या चार जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. इतर उर्वरित जिल्ह्यांत कुठलीही पावसाची शक्यता नसल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे. राज्यात संपूर्ण मे महिन्यानंतर जूनच्या सुरुवातीला पावसाचा जोर थोडा कमी होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
advertisement







