Weather Alert : महाराष्ट्रात पुन्हा कोसळणार पाऊस, 5 जिल्ह्यांसाठी अलर्ट

Last Updated:
ऑक्टोबरच्या सुरुवातीपासून राज्यातील काही भागांत अधूनमधून पावसाच्या सरी बरसत आहेत. 9 ऑक्टोबर रोजी राज्यातील अनेक भागांत पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.  
1/7
ऑक्टोबरच्या सुरुवातीपासून राज्यातील काही भागांत अधूनमधून पावसाच्या सरी बरसत आहेत. 9 ऑक्टोबर रोजी राज्यातील अनेक भागांत पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विशेषतः कोकण किनारपट्टी, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात ढगाळ वातावरणासह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. काही भागांत वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस होऊ शकतो. हवामान खात्याने काही जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी केला आहे. पाहुयात 9 ऑक्टोबर रोजी राज्यातील हवामानाची स्थिती कशी राहील.

advertisement
2/7
मुंबईसह कोकण विभागातील सर्वच जिल्ह्यांत वेगवेगळे हवामान बघायला मिळण्याची शक्यता आहे. पालघर, ठाणे आणि मुंबई परिसरात ढगाळ वातावरण राहून हलक्या पावसाची शक्यता आहे. रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांत ढगांच्या गडगडाटासह हलका ते मध्यम पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. सिंधुदुर्गसाठी हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे.

3/7
पश्चिम महाराष्ट्रातील पुणे आणि पुणे घाटमाथा भागात ढगांच्या गडगडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. सातारा आणि सातारा घाटमाथा परिसरात ढगाळ वातावरणासह हलक्या सरींची शक्यता आहे. तर कोल्हापूर, कोल्हापूर घाटमाथा, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या चार ठिकाणी यलो अलर्ट देण्यात आला आहे.

4/7
मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यांत ढगांच्या गडगडाटासह हलका पाऊस पडण्याचा अंदाज आहे. बहुतांश ठिकाणी पावसाचा जोर कमी राहील, मात्र दुपारनंतर वातावरण अधिक दमट होण्याची शक्यता आहे.

5/7
उत्तर महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्यांत ढगांच्या गडगडाटासह हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. दिवसभर आकाश ढगाळ राहून तापमानात किंचित घट जाणवण्याची शक्यता आहे.

6/7
विदर्भातील अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ जिल्ह्यांत मात्र हवामान कोरडे राहणार आहे. या भागात पावसाची कोणतीही शक्यता नाही. नागपूरमधील तापमान 23 ते 31 अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याची शक्यता आहे.

7/7
9 ऑक्टोबर रोजी राज्यातील काही जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यलो अलर्ट असलेल्या जिल्ह्यांतील नागरिकांनी बाहेर पडताना काळजी घ्यावी. विजांच्या कडकडाटादरम्यान उघड्या जागेत थांबणे टाळावे. मोबाइलचा वापर करणे किंवा झाडाखाली आसरा घेणे टाळावे, अशी सूचना हवामान विभागाने दिली आहे.

Shweta Tiwari: बोल्डनेसमध्ये लेकीला देते टक्कर, श्वेता तिवारी पलकपेक्षा किती मोठी? वयाचा फरक वाचून बसेल धक्का!
बोल्डनेसमध्ये लेकीला देते टक्कर, श्वेता तिवारी पलकपेक्षा किती मोठी?
    View All
    advertisement