Sai Thopate: कॉलेजमध्ये असताना मिळालं होतं तिकीट, आता 22 वर्षीय सई ठरली पुण्यात सर्वात तरुण नगरसेवक!

Last Updated:
Pune Corporater Sai Thopate: पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकींचे निकाल जाहीर होताच राज्य भरात नव्या चेहऱ्यांची आणि विशेषतः तरुण उमेदवारांची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. या निकालांमध्ये सर्वाधिक लक्ष वेधून घेतले आहे ते पुण्यातील सहकारनगर- पद्मावती प्रभाग क्रमांक 36 मधून विजयी झालेल्या भाजपाच्या 22 वर्षीय सई थोपटे यांनी. अवघ्या 22 वर्षांच्या सई थोपटे या सध्या कॉलेजमध्ये शिक्षण घेत असतानाच नगरसेवकपदी निवडून आल्याने त्या पुण्यातील सर्वात तरुण नगरसेवक ठरल्या आहेत.
1/6
 पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकींचे निकाल जाहीर होताच राज्य भरात नव्या चेहऱ्यांची आणि विशेषतः तरुण उमेदवारांची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. या निकालांमध्ये सर्वाधिक लक्ष वेधून घेतले आहे ते पुण्यातील सहकारनगर- पद्मावती प्रभाग क्रमांक 36 मधून विजयी झालेल्या भाजपाच्या 22 वर्षीय सई थोपटे यांनी.

advertisement
2/6
 अवघ्या 22 वर्षांच्या सई थोपटे या सध्या कॉलेजमध्ये शिक्षण घेत असतानाच नगरसेवकपदी निवडून आल्याने त्या पुण्यातील सर्वात तरुण नगरसेवक ठरल्या आहेत. सई थोपटे यांच्या विजयाने जेन झी (Gen Z) चा राजकारणातील सक्रिय सहभाग अधोरेखित झाला आहे. निवडणूक प्रचारादरम्यान त्यांनी भ्रष्टाचारमुक्त, पारदर्शक आणि नागरिकाभिमुख प्रशासन देण्याचे ठाम आश्वासन दिले होते.

3/6
 सई थोपटे यांनी जाहीर केलेल्या निवडणूक जाहीरनाम्यात प्रभागातील सर्वांगीण विकासावर भर दिला आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी आधुनिक सभागृह, भरती केंद्रांची उभारणी, प्रभागनिहाय कचरा प्रक्रिया प्रकल्प, अखंड पाणीपुरवठा, पाईपद्वारे गॅस कनेक्शन, संवेदनशील भागात सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे, सरकारी इमारतींमध्ये सौर ऊर्जेचा वापर आणि नागरिकांशी नियमित संवाद साधण्यासाठी खुल्या बैठका घेणे अशा अनेक महत्त्वाकांक्षी उपक्रमांचा त्यात समावेश आहे.

4/6
 सई थोपटे या सिम्बॉयसिस कॉलेजमध्ये बीबीएचे शिक्षण घेत असून त्या सध्या एमबीए करण्याच्या मार्गावर आहेत. नगरसेवक म्हणून जबाबदारी सांभाळतानाच शिक्षण सुरू ठेवण्याचा त्यांचा मानस आहे. मी गेल्या पाच वर्षांपासून अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेशी सक्रियपणे जोडलेली आहे. तरुणांच्या समस्या मला जवळून माहिती आहेत आणि गेल्या काही वर्षांत वॉर्डमध्ये सातत्याने काम केले आहे असे सई सांगतात.

5/6
 सई यांच्या सामाजिक जडणघडणीमागे कुटुंबाचा मोठा वाटा आहे. त्यांच्या वडिलांनी आधार फाउंडेशनच्या माध्यमातून अनेक वर्षे विविध सामाजिक समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न केले आहेत. त्याच प्रेरणेतून सई यांनीही प्रभागातील पाणी, स्वच्छता, सुरक्षितता आणि मूलभूत सुविधांच्या प्रश्नांवर प्राधान्याने काम करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.

6/6
 सर्वात तरुण नगरसेवक म्हणून सई थोपटे यांचे नाव सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत असून, त्यांच्या कामगिरीकडे आता संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.

Santosh Dhuri On MNS : महापालिका निवडणुकीत मनसेची धूळदाण, संतोष धुरींचा पहिला वार; "उद्धव ठाकरेंनी मनसेला..."
महापालिका निवडणुकीत मनसेची धूळदाण, संतोष धुरींचा पहिला वार; "उद्धव ठाकरेंनी मनसे
  • महानगरपालिका निवडणुकीच्या निकालानंतर राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी

  • भाजपमध्ये प्रवेश केलेले नेते संतोष धुरी यांनी मनसेच्या कामगिरीवर आणि रणनीतीवर पह

  • संतोष धुरी यांचा उद्धव ठाकरेंवर खळबळजनक आरोप...

View All
advertisement