Pune Weather Update : पुढील 24 तास धोक्याचे, पश्चिम महाराष्ट्रात पारा 10 च्या खाली, हवामान खात्याचा अलर्ट
- Published by:Mohan Najan
- Reported by:Priti Nikam
Last Updated:
राज्यात गारठा कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. पश्चिम महाराष्ट्रात पुढील 24 तासांत हवामानाची स्थिती कशी राहील पाहुयात.
उत्तरेकडील गोठवणारी थंडी महाराष्ट्रावर येऊन धडकत असल्याने थंडीची तीव्र लाट आली आहे. काही ठिकाणी पारा 7 अंशांच्या खाली घसरल्याने हंगामातील नीचांकी तापमानाची नोंद होत आहे. निफाडमध्ये तापमान अधिकच घसरल्याने दबबिंदू गोठल्याचे दिसून आले. आज दिनांक 19 नोव्हेंबर रोजी उत्तर महाराष्ट्रात थंडीच्या लाटेचा इशारा असून, उर्वरित राज्यात गारठा कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. पश्चिम महाराष्ट्रात पुढील 24 तासांत हवामानाची स्थिती कशी राहील पाहुयात.
advertisement
advertisement
advertisement
कोल्हापूरमध्ये देखिल गारठा वाढत असून दिवसाची सुरुवात साधारण 16 अंश सेल्सिअसच्या किमान तापमानाने होवून, जसजसा दिवस पुढे जाईल तसतसे कमाल तापमान 30 अंश सेल्सिअसवर जाण्याची शक्यता आहे. सकाळी दाट धुक्यासह पडलेल्या थंडिचा गारवा दिवसभर टिकून राहिल. दुपारी उन्हाचा चटका वाढला तरी सायंकाळी गारठा वाढण्याची शक्यता आहे.
advertisement
advertisement
advertisement


