Pune Rain: पुणे ते कोल्हापूर पावसाची उघडीप की पुन्हा कोसळणार? हवामान विभागाकडून महत्त्वाचा अलर्ट

Last Updated:
Pune Rain: पश्चिम महाराष्ट्रातील हवामानात मोठे बदल जाणवत आहेत. पुणे ते कोल्हापूर घाटमाथा वगळता इतर भागात पावसाचा जोर ओसरणार आहे.
1/7
राज्याच्या दक्षिण भागात मे महिन्यातच मान्सूनने दमदार हजेरी लावली आहे. आज 29 मे रोजी पश्चिम महाराष्ट्रत पावसाचा जोर ओसरण्याची शक्यता आहे. कोल्हापूर, पुणे आणि साताऱ्याच्या घाटमाथ्यावर मात्र जोरदार पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा अलर्ट भारतीय हवामान विभागाने जारी केला आहे. पुढील 24 तासातील पुण्यासह पश्चिम महाराष्ट्रातील जिल्हानिहाय हवामान अंदाज जाणून घेऊ.

advertisement
2/7
कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरला आहे. कमाल तापमान 28 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 22 अंश सेल्सिअस वर राहण्याची शक्यता आहे. आज काही ठिकाणी पावसाच्या हलक्या पावसाच्या सरी बरसतील. घाटमाथ्यावर मात्र विजांच्या कडकडाट जोरदार पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा यलो अलर्ट दिला आहे.

3/7
पुणे जिल्ह्यातील बहुतांश भागात पावसाने विश्रांती घेतली आहे. पुण्यातील तापमानात अंशता वाढ होऊन कमाल तापमान 30 अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. पुढील 24 तासात साधारण ढगाळ आकाश राहून तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे. पुण्याच्या घाटमाथ्यावर मात्र विजांच्या कडकडाट जोरदार पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.

4/7
धो-धो अवकाळी पावसाच्या विश्रांतीनंतर सातारकरांनी सुमारे पंधरा दिवसांनी सूर्योदय पाहिला. पुढील 24 तासात सातारा जिल्ह्यात हलक्या पावसासह ढगाळ हवामान राहील. साताऱ्याच्या घाटमाथ्यावर मात्र विजांचा कडकडाटासह जोरदार पावसाचा यलो अलर्ट दिला आहे.

5/7
सोलापुरातील बहुतांश ठिकाणी मागील 24 तासात जोरदार पावसाने हजेरी लावली. अवकाळी पावसाच्या आगमनाने अवर्षण भागातील ओढे, नद्या तुडुंब भरून वाहत आहेत. पुढील 24 तासात ढगांच्या गडगडाटासह हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. सोलापुरातील कमाल तापमान 33 अंश सेल्सिअस राहील.

6/7
सांगली जिल्ह्यातील बहुतांश भागात पावसाचा जोर ओसरला आहे. मागील 24 तासात कसबेडिग्रज परिसरात 40 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. पुढील 24 तासात सांगलीतील कमाल तापमान 28 अंश सेल्सिअस राहील. जिल्ह्यात ढगाळ आकाशासह तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे.

7/7
गेल्या काही काळात लागून राहिलेल्या अवकाळी पावसाने ऊस, द्राक्ष पिकांच्या मेहनतींची कामे खोळंबली आहेत. तसेच हळद, आले आणि ऊस लावणीसाठी ठेवलेल्या शेतांना तळ्यांचे स्वरूप आल्याने मे महिन्याच्या शेवटी होणाऱ्या लावणी लांबणीवर पडल्या आहेत. जत, आटपाडी भागातील फळबागांवर सततच्या पावसाने रोगराईच्या प्रादुर्भावाचा फटका बसत आहे. पावसाचा जोर ओसरल्याने शेतकरी शेतांना वापसा येण्याच्या प्रतीक्षेत आहेत.

Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement