Weather Alert: छत्री सोबतच ठेवा, आज कधीही भिजवू शकतो पाऊस, पुणे ते कोल्हापूर हवामान अंदाज
- Reported by:Priti Nikam
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
Weather Alert: पश्चिम महाराष्ट्रातील हवामानात मोठे बदल जाणवत आहेत. आज पुण्यात ढगाळ हवामान राहणार असून हलक्या पावसाचा अंदाज आहे.
advertisement
पुणे जिल्ह्यातील शुक्रवारी पावसाची रिपरिप राहिली. तर घाटमाथ्यावरील पावसाचा जोर कमी आहे. मागील 24 तासात पुण्याच्या शिवाजीनगर परिसरात 0.1 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. यावेळी कमाल तापमान 29.8 अंश सेल्सिअस राहिले. पुढील 24 तासात पुण्यातील कमाल तापमान 30 अंशावर राहिल. हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
advertisement
सातारा जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरला आहे.मागील 24 तासात सातारा परिसरामध्ये 0.2 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. धरण क्षेत्रामध्ये मागील काही दिवसांपासून सुरू असलेला पावसाचा जोर ओसरला आहे. पुढील 24 तासात साताऱ्यातील कमाल तापमान 30 अंश सेल्सिअस राहिल. सातारा जिल्ह्यामध्ये ढगाळ आकाशासह हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement









