Weather Alert: 4 दिवसांची विश्रांती संपली, आज धो धो कोसळणार, पुणे ते कोल्हापूर यलो अलर्ट
- Reported by:Priti Nikam
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
Weather Alert: गेल्या काही दिवसांपसून राज्यातील मान्सूनचा जोर ओसरला आहे. पश्चिम महाराष्ट्रातील घाट भागात पुन्हा जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलीये.
राज्यात गेल्या काही दिवसांत पावसाचा जोर ओसरला आहे. कमाल तापमानात वाढ होऊन पारा तिशीपार गेले आहे. आज 13 जुलै रोजी पश्चिम महाराष्ट्रातील घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा येलो अलर्ट भारतीय हवामान विभागाने दिला आहे. चार दिवसांच्या विश्रांतीनंतर पुणे, सातारा आणि कोल्हापूर घाटमाथ्यावर पुन्हा जोरदार पाऊस बरसणार आहे.
advertisement
advertisement
advertisement
कोल्हापूर परिसरात 0.1 मिलीमीटर पाऊस नोंदविण्यात आला. यावेळी कमाल तापमानात वाढ नोंदविण्यात आली. कमाल तापमान 29.1 अंश सेल्सिअस राहिले. पुढील 24 तासात कमाल तापमान 29 अंशावर स्थिर राहील. तसेच कोल्हापूर घाटमाथ्यावर जोरदार पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा यलो अलर्ट हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.
advertisement
advertisement
advertisement









