Weather Alert: अवकाळी संकट सरलं आता पुन्हा नवं संकट, पश्चिम महाराष्ट्रातील 4 जिल्ह्यांना हवामान विभागाचा अलर्ट
- Published by:Mohan Najan
- Reported by:Priti Nikam
Last Updated:
पश्चिम महाराष्ट्रातील अनेक ठिकाणांना अवकाळी पावसाने झोडपले असून कमाल तापमानात काहीशी घट झाली आहे. आज दिनांक 28 एप्रिल रोजी पश्चिम महाराष्ट्रात सर्वत्र आकाश निरभ्र राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.
पश्चिम महाराष्ट्रातील अनेक ठिकाणांना अवकाळी पावसाने झोडपले असून कमाल तापमानात काहीशी घट झाली आहे. आज दिनांक 28 एप्रिल रोजी पश्चिम महाराष्ट्रात सर्वत्र आकाश निरभ्र राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. काल दिनांक 27 एप्रिल रोजी पश्चिम महाराष्ट्रातील सरासरी तापमान 20.2 ते 42.5 अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहीले. पुढील 24 तासात पश्चिम महाराष्ट्रातील हवामान स्थितीबाबत अंदाज जाणून घेऊ.
advertisement
advertisement
सांगली जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्याने हजेरी लावली. उन्हाच्या झळांनी होरपळणाऱ्या वातावरणात जिल्ह्याने वादळी पाऊस अनुभवला. पुढील 24 तासात सांगली जिल्ह्यातील कमाल तापमान 38 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 23 अंश सेल्सिअस राहिल. सांगली जिल्ह्यात आकाश मुख्यता निरभ्र राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.
advertisement
सातारा जिल्ह्यातील पारा पुढील 24 तासात स्थिर राहील. कमाल तापमान 40 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 23 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. साताऱ्यात काल अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस कोसळल्याने वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. आज मात्र सातारा जिल्ह्यातील आकाश निरभ्र राहणार आहे.
advertisement
advertisement
सोलापूर जिल्ह्यात मागील 24 तासात कमाल तापमान 41.1 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 24.6 अंश सेल्सिअस इतके होते. पुढील 24 तासात आकाश निरभ्र राहील. यावेळी सोलापूर जिल्ह्यातील कमाल तापमान 41 अंशांवर तर किमान तापमान 25 अंशांवर असल्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. पुढील चार दिवस सोलापुरातील तापमानात वाढ होणार असून पारा पुन्हा 45 अंशापर्यंत पोहोचणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
advertisement
पश्चिम विदर्भापासून मराठवाडा, कर्नाटक, तामिळनाडू ते मनारच्या आखातापर्यंत दक्षिणोत्तर हवेचा कमी दाबाचा पट्टा कायम आहे. राज्यात उन्हाचा चटका, उकाडा आणि घामाच्या धारा तापदायक ठरत आहेत. पश्चिम महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये पुढील 24 तास निरभ्र आकाश राहणार असून उन्हाचे चटके सहन करावे लागणार आहेत. त्यामुळे नागरिकांनी आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे.