Weather Alert: विजांच्या कडकडाटात अवकाळी झोडपणार, पश्चिम महाराष्ट्राला अलर्ट, आजचा हवामान अंदाज
- Reported by:Priti Nikam
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
Weather Update: पश्चिम महाराष्ट्रावर अवकाळी संकट घोंघावत आहे. पुढील 24 तासांसाठी काही भागात हवामान विभागाने यलो अलर्ट दिला आहे.
advertisement
advertisement
advertisement
सांगली जिल्हामध्ये उन्हाचा चटका चांगलाच वाढला आहे. पुढील 24 तासात कमाल तापमान 39 अंश सेल्सिअस राहिल तर किमान तापमान 23 अंश सेल्सिअस इतके असेल. जिल्ह्याच्या तापमानात आज बदल जाणवत असून आकाश अंशतः ढगाळ राहून गडगडाची पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. सांगली जिल्ह्यात विजांसह पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे.
advertisement
advertisement
सोलापूर जिल्ह्यातील तापमानातील वाढ कायम असून कमाल तापमान 41 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 25 अंश सेल्सिअस इतके राहील. दिवसभरच्या वाढत्या तापमानासह अंशतः ढगाळ वातावरण आणि विजांच्या कडकडाटासह मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. तसेच वादळी वारे विजांसह पावसाची शक्यता असल्याने पुढील 24 तास सोलापूर जिल्ह्यासाठी अलर्ट देण्यात आला आहे.
advertisement










