आजचं हवामान: सावधान! 10 ते 4 बाहेर पडू नका, पश्चिम महाराष्ट्रात उष्णतेची लाट, 3 जिल्ह्यांना यलो अलर्ट
- Reported by:Priti Nikam
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
Weather Update: पश्चिम महाराष्ट्रात उन्हाचा तडाखा वाढला असून सूर्य आग ओकत असल्याचे चित्र आहे. पुढील 24 तासांसाठी यलो अलर्ट देण्यात आला आहे.
राज्यातील काही जिल्ह्यांत उष्णतेची लाट असून वाढत्या तापमानाने नागरिक हैराण आहेत. शुक्रवारी अकोला येथे राज्यातील उच्चांकी 44.9 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. अन्य 11 जिल्ह्यांसह पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यात 42 अंश अधिक तापमानाची नोंद झाली. पुढील 24 तासात पश्चिम महाराष्ट्रातील हवामान अंदाज जाणून घेऊ.
advertisement
पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सोलापूर या तीन जिल्ह्यांमध्ये उष्ण व दमट हवामानाच्या अंदाजासह यलो अलर्ट देण्यात आला आहे. आज 19 एप्रिल रोजी पश्चिम महाराष्ट्रातील सरासरी तापमान 20.3 ते 42.8 अंश सेल्सिअसच्या आसपास असेल. सोलापूर जिल्ह्यात कमाल तापमान 42 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 26 अंश सेल्सिअस इतके राहील.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement










