Weather Alert: कोल्हापूर, सांगलीवर आस्मानी संकट, सोलापूरला यलो अलर्ट, आजचं हवामान
- Reported by:Priti Nikam
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
Weather Alert: पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली जिल्ह्यात वादळी पावसाने हजेरी लावली. आज 24 एप्रिल रोजी हवामान आणि तापमान स्थितीबाबत जाणून घेऊ.
सूर्याच्या तडाख्यामुळे महाराष्ट्रतील अनेक भाग उष्णतेने होरपळत आहेत. पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सोलापूर आणि सांगली जिल्ह्यांत उष्ण व दमट हवामानाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. मागील 24 तासात पश्चिम महाराष्ट्रातील सरासरी तापमान 19.7 ते 43.5 अंश सेल्सिअस दरम्यान राहीले होते. पुढील 24 तासात पश्चिम महाराष्ट्रातील हवामान स्थितीबाबत अंदाज जाणून घेऊ.
advertisement
सोलापूर जिल्ह्यात मागील 24 तासात कमाल तापमान 43.4 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 29.1 अंश सेल्सिअस इतके होते. पुढील 48 तासांसाठी सोलापूर जिल्ह्याला उष्ण लाटेचा इशारा देण्यात आला आहे. यावेळी सोलापूर जिल्ह्यातील कमाल तापमान 41 अंशांवर तर किमान तापमान 26 अंशांवर जाण्याचा अंदाज आहे. उष्णतेच्या लाटेपासून संरक्षण म्हणून योग्य ती काळजी घेण्याचे आवाहन हवामान विभागाने नागरिकांना केले आहे.
advertisement
advertisement
advertisement
सांगलीतील मिरज आणि तासगाव येथे बुधवारी प्रत्येकी 10 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. काही ठिकाणी झालेल्या गारपिटीमुळे नवीन काडी तयार होत असलेल्या द्राक्षबागांना फटका बसला आहे. पुढील 24 तासात सांगली जिल्ह्यातील कमाल तापमान 42 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 24 अंश सेल्सिअस राहील. जिल्ह्यात उष्ण व दमट हवामानाचा यलो अलर्ट हवामान विभागाने दिला आहे.
advertisement
advertisement









