आजचं हवामान: वादळी वारे वाहणार, गारपीट होणार; पुणे, सोलापूरवर आस्मानी संकट, 24 तास धोक्याचे!
- Reported by:Priti Nikam
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
Weather Alert: पश्चिम महाराष्ट्रावर आस्मानी संकट घोंघावत आहे. पुणे, सातारा, सांगलीसह सोलापूर जिल्ह्यांसाठे आज वादळी पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
राज्यात पूर्वमोसमी पावसाचा दणका सुरू आहे. आज 18 मे रोजी पुन्हा वादळी पावसाची शक्यता असल्याने 33 जिल्ह्यांना सतर्कतेचा येलो अलर्ट आहे. तसेच पश्चिम महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यात वादळी पाऊस, गारपीट होण्याची आणि सातारा, सांगली, सोलापूर जिल्ह्यांत वादळी वाऱ्याची शक्यता असल्याने दक्षतेचा ऑरेंज अलर्ट भारतीय हवामान विभागाने दिला आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement







