Rain Alert: रेनकोट जवळच ठेवा, अचानक येणार वादळी पाऊस, पश्चिम महाराष्ट्रातील हवामान अंदाज

Last Updated:
Weather Alert: पश्चिम महाराष्ट्रावर आज आस्मानी संकट घोंघावत असून पुणे आणि सातारा जिल्ह्यांत गारपिटीची शक्यता आहे. हवामान विभागाने पुढील 24 तासांसाठी अलर्ट दिला आहे.
1/7
पश्चिम महाराष्ट्रात वादळी पाऊस आणि ढगाळ हवामानामुळे तापमानात घट झाली आहे. गेल्या 24 तासात पश्चिम महाराष्ट्रातील सरासरी कमाल तापमान 40.2 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 14.4 अंश सेल्सिअस इतके राहिले. पुढील 24 तासांचे जिल्हा निहाय हवामानाचे अंदाज जाणून घेऊ.

advertisement
2/7
सोलापूर जिल्ह्यातील पारा अंशता कमी होऊन 40.2 अंशावर राहिला. तसेच सोलापुरात ढगांच्या गडगडाटासह वादळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. ढगाळ वातावरणाने तापमान अंशतः कमी होऊन 38 अंशावर राहण्याचा अंदाज आहे. वादळी पावसाची शक्यता असल्याने सोलापूर जिल्ह्यात सतर्कतेचा यलो अलर्ट दिला आहे.

3/7
पुणे जिल्ह्यात उन्हाचा चटका कायम असून मागील 24 तासात 37.2 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. तर पुढील 24 तासात पुण्यातील पारा 37 अंशांवर राहण्याचा अंदाज आहे. तसेच निरभ्र आकाश दुपारनंतर ढगाळ होईल. पुण्यात मागील 24 तासात तुरळक ठिकाणी पावसाची नोंद झाली.

4/7
सातारा जिल्ह्यातील कमाल पारा 36 अंश सेल्सिअस तर किमान 23 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे. साताऱ्यात ढगाळ आकाश राहून हलक्या पावसाचा अंदाज आहे.

5/7
सांगली जिल्ह्यातील कमाल तापमानात अंशतः घट दिसून येते. मागील 24 तासात सांगलीत 37.4 अंश सेल्सिअस तापमान राहिले. तसेच येत्या 24 तासात जिल्ह्यातील तापमान 37 अंशावर स्थिर राहण्याचा अंदाज आहे. गडगडाटी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

6/7
कोल्हापुरातील पारा 36.5 अंशापर्यंत असून पुढील 24 तासात कोल्हापुरातील तापमान स्थिर राहील. कमाल 36 अंश तर किमान तापमान 23 अंश सेल्सिअस इतके राहील. दुपारनंतर आकाश अंशतः ढगाळ होऊन गडगडाटी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

7/7
दरम्यान, गेल्या काही काळात पश्चिम महाराष्ट्रातील हवामानात मोठे बदल जाणवत आहेत. सोलापूर वगळता पुढील 2 दिवस कोणत्याही जिल्ह्यांना अलर्ट नाही. परंतु, त्यानंतर पुन्हा हवापालट होणार असून पश्चिम महाराष्ट्रात अवकाळी संकत येणार आहे. त्यामुळे नागरिकांना काळजी घ्यावी लागेल.