Western Maharashtra Weather: पुढील 24 तास पश्चिम महाराष्ट्रात जोरदार पावसाचे, 2 जिल्ह्यांना हवामान विभागाचा ऑरेंज अलर्ट
- Reported by:Priti Nikam
- Published by:Mohan Najan
Last Updated:
Western Maharashtra Weather Update: पश्चिम महाराष्ट्रातील घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस कोसळतो आहे. आज दिनांक 29 जून रोजी कोकण आणि घाटमाथ्यावर जोरदार पावसाची शक्यता कायम आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
मागील 24 तासांमध्ये सातारा शहरात 7 मिलीमीटर पाऊस नोंदविण्यात आला. कमाल तापमान 27.7 अंश सेल्सिअस राहिले. पुढील 24 तासात कमाल तापमान 28 अंशावर राहील. ढगाळ आकाशासह हलक्या पावसाचा अंदाज भारतीय हवामान विभागाने दिला आहे. सातारा जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर जोरदार पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा ऑरेंज अलर्ट हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.
advertisement
advertisement
मागील 24 तासात सांगली जिल्ह्यात 3 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. मागील दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर मध्यरात्रीपासून पावसाने पुन्हा सुरुवात केली आहे. पुढील 24 तासात सांगली जिल्ह्यात ढगाळ आकाशासह हलक्या पावसाचा अंदाज आहे. यावेळी जिल्ह्यातील कमाल तापमान 29 तर किमान तापमान 23 अंश सेल्सिअस इतके राहील. पावसाची उघडीप असलेल्या भागात कमाल तापमानातील वाढ कायम आहे. शनिवारी सकाळपर्यंतच्या 24 तासांमध्ये जेऊर येथे राज्यातील उच्चांकी 33.5 अंकी तापमानाची नोंद झाली. कोकण, घाटमाथ्यासह विदर्भात पावसाच्या सरीमागून सरी येत असल्या तरी उर्वरित राज्यात पावसाची प्रतीक्षा आहे.घाटमाथ्यावर पावसाचा जोर अधिक आहे.










