Weather Alert : पश्चिम महाराष्ट्राला धोक्याची घंटा! पुन्हा अवकाळी पाऊस कोसळणार, पाहा हवामान अंदाज

Last Updated:
गुजरात आणि परिसरावर तसेच उत्तर कर्नाटकात चक्राकार वाऱ्याची स्थिती आहे. यामुळे राज्यात पूर्वमोसमी वादळी पावसाचे सावट कायम आहे. संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रास यलो अलर्ट देण्यात आला आहे.
1/7
राज्यात पूर्वमोसमी पावसाने हजेरी लावली असून, वादळी पावसाचे सावट कायम आहे. शुक्रवार दिनांक 16 मे रोजी पश्चिम महाराष्ट्रातील सांगली, सातारा तसेच पुणे जिल्ह्यात पावसाची नोंद झाली. यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून कमल तापमानात घट जाणवते.पुढील 24 तासातील पश्चिम महाराष्ट्रात असणारे जिल्हा निहाय हवामान अंदाज जाणून घेऊ.

advertisement
2/7
गुजरात आणि परिसरावर तसेच उत्तर कर्नाटकात चक्राकार वाऱ्याची स्थिती आहे. यामुळे राज्यात पूर्वमोसमी वादळी पावसाचे सावट कायम आहे.

3/7
कोकणातील पालघर, सिंधुदुर्ग तसेच पुणे, नाशिक, सातारा, सांगली, लातूर, तसेच विदर्भातील वर्धा, अकोला जिल्ह्यांत विविध ठिकाणी पावसाची नोंद होत आहे. संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रात अवकाळी पावसाने गारवा पसरल्याने काही महिन्यांपासून उष्णतेने होरपळणाऱ्या सोलापूर जिल्ह्यातील तापमानात देखील अंशतः घट झाली आहे.

4/7
मागील 24 तासात सोलापुरातील कमाल तापमान 37 अंश राहिले. पुढील 24 तासात आकाश ढगाळ राहून गडगडाटी वादळाची शक्यता आहे. सांगली जिल्ह्यातील पलूस, कडेगाव, वाळव्यासह विविध ठिकाणी अवकाळी पाऊस कोसळला. आज कमाल तापमान 34 अंशांवर तर किमान तापमान 25 अंशांवर राहिल. आकाश अंशतः ढगाळ राहून मध्यम पावसाची शक्‍यता आहे.

5/7
सातारा जिल्ह्यातील विविध ठिकाणी हलक्या पावसाची नोंद झाली. पुढील 24 तासासाठी साताऱ्यात गडगडाटी पावसाचा येलो अलर्ट आहे. यावेळी ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगवान वाऱ्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. कमाल तापमान 36 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 24 अंश सेल्सिअस इतके राहिल. कोल्हापूर जिल्ह्यात मागील 24 तासात 12 मिलीमीटर पावसाची नोंद झाली.

6/7
तसेच आकाश अंशतः ढगाळ राहून मध्यम पाऊस किंवा गडगडाटी वादळाची शक्यता आहे. यावेळी ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगवान वारे वाहील. जिल्ह्यातील कमाल तापमान 34 अन् किमान तापमान 24 अंश सेल्सिअस राहिल. पुणे जिल्ह्यात ढगाळ वातावरण असून मागील 24 तासात 35.6 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली.

7/7
 तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची नोंद झाली. पुढील 24 तासात पुण्यातील पारा 35 अंशांवर स्थिर राहिल. तसेच वादळी वाऱ्यासह तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज आहे. सांगली ,सातारा, कोल्हापूर, सोलापूर, पुण्यासह संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रात वादळी पावसाची शक्यता असल्याने दक्षतेचा यलो अलर्ट भारतीय हवामान विभागाने दिला आहे.

Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement