खंडोबारायाची कृपा! आज चंपाषष्टीच्या मुहूर्तावर आला मोठा योग, 6 डिसेंबरपर्यंत 5 राशींचं होणार चांगभलं
- Published by:Ajit Bhabad
Last Updated:
Astrology News : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार 26 नोव्हेंबर 2025 हा दिवस अनेक राशींसाठी अत्यंत शुभ ठरणार आहे. कारण या दिवशी सूर्य, मंगळ आणि शुक्र यांचा शक्तिशाली त्रिग्रही योग तयार होणार आहे.
वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार 26 नोव्हेंबर 2025 हा दिवस अनेक राशींसाठी अत्यंत शुभ ठरणार आहे. कारण या दिवशी सूर्य, मंगळ आणि शुक्र यांचा शक्तिशाली त्रिग्रही योग तयार होणार आहे. तीन प्रभावशाली ग्रहांच्या या युतीमुळे पाच राशींना अनपेक्षित यश, आर्थिक वृद्धी आणि जीवनात नवीन संधी मिळण्याची शक्यता वाढली आहे. पंचांगानुसार हा योग 6 डिसेंबर 2025 पर्यंत प्रभावी राहील.
advertisement
मेष - त्रिग्रही योगामुळे मेष राशीवाल्यांचे करिअर तेजीत येईल. अचानक बढती, महत्त्वाचे प्रोजेक्ट आणि मान-सन्मान मिळू शकतो. कामात वेगाने प्रगती होईल आणि निर्णय क्षमता सुधारेल. आर्थिक बाबतीत शुभ काळ असून नवे व्यवहार यशस्वी होतील. कुटुंबात आनंद आणि सौहार्द राहील. बेरोजगारांना नोकरीच्या संधी उपलब्ध होतील.
advertisement
सिंह - सिंह राशीवाल्यांसाठी हा काळ सोन्याचा मौका घेऊन येणार आहे. नेतृत्वगुण अधिक प्रभावी दिसतील. समाज आणि करिअरमध्ये मान वाढेल. आर्थिकदृष्ट्या लाभाचे वातावरण निर्माण होईल. बोनस, वेतनवाढ किंवा अनपेक्षित पैसा मिळण्याची शक्यता जास्त. विद्यार्थी, कलाकार, मीडिया क्षेत्रातील व्यक्तींना विशेष यश मिळेल. घरात आनंदी आणि शांततापूर्ण वातावरण राहील.
advertisement
वृश्चिक - त्रिग्रही योग वृश्चिक राशीतच तयार होत असल्याने या राशीला सर्वात जास्त फायदा होणार आहे. व्यक्तिमत्त्व तेजस्वी होईल, निर्णय क्षमता सुधारेल आणि कार्यक्षमता अधिक वाढेल. करिअरमध्ये नवी उंची गाठता येईल. थकित पैसे परत मिळू शकतात. आर्थिक स्थिती मजबूत होईल. वैवाहिक आणि प्रेम जीवनात सकारात्मकता वाढेल. हा काळ वृश्चिकांसाठी शक्ती, यश आणि आत्मविश्वास वाढवणारा ठरेल.
advertisement
advertisement
advertisement


