शनी उलट चालेल, फायदा तुमचा होईल; 3 राशींचं नशीब हिऱ्यासारखं चमकेल!
- Published by:Isha Jagtap
- local18
Last Updated:
Shani Effect On Rashi : ज्योतिषशास्त्रात ग्रह, ताऱ्यांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यात शनी ग्रहाला विशेष महत्त्व दिलं जातं. ज्याच्या कुंडलीत शनीचं स्थान कमकुवत त्याच्या मागे अडचणींचा डोंगर हे समीकरण ठरलेलंच आहे. परंतु ज्याच्या कुंडलीत शनीचं स्थान भक्कम असतं, ती व्यक्ती राजासारखं आयुष्य जगते यातही काही शंका नाही. आता शनी उलट चाल चालणार आहे. त्यामुळे काही राशींच्या व्यक्तींना अडचणींचा सामना करावा लागेलच, परंतु काही राशींच्या व्यक्तींना एवढं सुख अनुभवायला मिळेल की त्यांचा त्यांच्या नशिबावर विश्वास बसणार नाही. (सर्वेश श्रीवास्तव, प्रतिनिधी / अयोध्या)
उत्तर प्रदेशच्या अयोध्येतील ज्योतिषी पंडिक कल्की राम सांगतात की, जून महिन्याच्या 29 तारखेला रात्री 12 वाजून 35 मिनिटांनी शनी कुंभ राशीत वक्र होईल. 15 नोव्हेंबरला त्याची चाल सरळ होईल. म्हणजेच मधल्या काळात त्याच्या उलट चालीचा सर्व 12 राशींवर सकारात्मक किंवा नकारात्मक परिणाम होईल. त्यातूनच 3 राशींचं नशीब पार उजळून निघेल. या भाग्यवान राशी नेमक्या कोणत्या आहेत, जाणून घेऊया.
advertisement
advertisement
वृश्चिक : तुम्हालासुद्धा शनीच्या वक्र चालीचा विशेष लाभ मिळेल. करियरमध्ये भरपूर प्रगती होईल. व्यापार विस्तारेल. उत्पन्नाचे नवे स्त्रोत निर्माण होतील. धार्मिक कार्यात सहभागी व्हाल.
advertisement
advertisement