Tukdoji Maharaj: राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना मौन श्रद्धांजली! गुरुकुंज मोझरीत उसळला भक्तांचा सागर, PHOTOS

Last Updated:
Tukdoji Maharaj: राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या 57 व्या पुण्यतिथीनिमित्त गुरुकुंज मोझरी येथे मौन श्रद्धांजली कार्यक्रम झाला. यावेळी देशभरातून मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते.
1/7
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या 57 व्या पुण्यतिथीनिमित्त अमरावतीतील गुरुकुंज मोझरी येथे शनिवारी मौन श्रद्धांजली कार्यक्रम झाला. अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळातर्फे 11 ऑक्टोबरला या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यासाठी सकाळपासूनच आश्रम परिसरात देशभरातील भाविकांचा जनसागर उसळला होता.

advertisement
2/7
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त गेले 7 दिवस गुरुकुंज मोझरी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. त्याला भाविकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. शांततेत, भक्तिभावाने आणि शिस्तबद्ध वातावरणात हा श्रद्धांजली कार्यक्रम झाला. 11 ऑक्टोबर रोजी ठिक 4. 58 मिनिटांनी सर्व उपस्थितांनी एकत्रित मौन बाळगून राष्ट्रसंतांना श्रद्धांजली अर्पण केली.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त गेले 7 दिवस गुरुकुंज मोझरी येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. त्याला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शांततेत, भक्तिभावाने आणि शिस्तबद्ध वातावरणात हा श्रद्धांजली कार्यक्रम झाला. 11 ऑक्टोबर रोजी ठीक 4.58 मिनिटांनी सर्व उपस्थितांनी एकत्रित मौन बाळगून राष्ट्रसंतांना श्रद्धांजली अर्पण केली.
advertisement
3/7
राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी 11 ऑक्टोबर 1968 रोजी सायंकाळी 4 वाजून 58 मिनिटांनी देह ठेवला. दरवर्षी या वेळेला गुरुकुंज मोझरी येथे मौन श्रद्धांजली अर्पण केली जाते. या वर्षी देखील हाच क्षण अत्यंत भावनिक वातावरणात साजरा झाला. शंखनाद, तबला, पेटी या पारंपरिक वाद्यांच्या निनादात आणि सर्वधर्मीयांच्या सामूहिक प्रार्थनांदरम्यान संपूर्ण परिसर काही क्षणांसाठी शांततेत गुरुमय झाला होता.

4/7
या वेळी हजारो भाविक हात जोडून ‘गुरुशक्ती’चे स्मरण करत होते. आश्रम परिसरात अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने आणि शांततेत श्रद्धांजलीचा कार्यक्रम पार पडला. पुण्यतिथी निमित्त मोठी यात्रा भरविण्यात आली होती.
या वेळी हजारो भाविक हात जोडून ‘गुरुशक्ती’चे स्मरण करत होते. आश्रम परिसरात अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने आणि शांततेत श्रद्धांजलीचा कार्यक्रम पार पडला. पुण्यतिथीनिमित्त मोठी यात्रा भरविण्यात आली होती.
advertisement
5/7
महाराष्ट्रासह देशभरातून आणि परदेशातून आलेल्या हजारो भक्तांनी सहभाग घेतला. गावागावातून दिंड्या, कीर्तन मंडळे, स्वयंसेवक गट उत्साहाने गुरुकुंज मोझरीत दाखल झाले. संपूर्ण परिसरात “जय गुरुदेव”च्या घोषणांनी वातावरण दुमदुमले होते.

6/7
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज हे जनजागृती, ग्रामस्वच्छता, समाजसेवा आणि राष्ट्रीय एकतेचे पुरस्कर्ते होते. त्यांच्या ग्रामगीतेने आणि कीर्तन चळवळीने समाजजीवनात जागृती घडवली.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज हे जनजागृती, ग्रामस्वच्छता, समाजसेवा आणि राष्ट्रीय एकतेचे पुरस्कर्ते होते. त्यांच्या ग्रामगीतेने आणि कीर्तन चळवळीने समाजजीवनात जागृती घडवली.
advertisement
7/7
गुरुकुंज मोझरी हे राष्ट्रसंतांचे कर्मस्थळ आणि समाधीस्थान असून आजही लाखो भक्तांसाठी ती आध्यात्मिक प्रेरणास्थळ आहे. यंदाच्या पुण्यतिथीला झालेला भक्तांचा जनसागर हेच त्यांच्या उपदेशांचे खरे यश असल्याचे दर्शन सर्वांना घडले.

OTT Movie: बोल्ड सीन्सने भरलेला सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका; 2 तास 28 मिनिटांची कहाणी ओटीटीवर हिट
2 तास 28 मिनिटांचा बोल्ड सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका
    View All
    advertisement