शिक्षण उत्तम, तरी मनासारखी नोकरी नाही? प्रसिद्ध ज्योतिषांनी सांगितलं नेमकं चुकतंय काय
- Published by:Isha Jagtap
- local18
Last Updated:
Astro Jyotish Upay : शाळा, महाविद्यालयात एखादा विद्यार्थी हुशार असतो, पुढे उच्चशिक्षितही होतो. त्याला कोणतीही नोकरी सहज मिळू शकते. मात्र तरी कितीही प्रयत्न करूनही मनासारखी संधी मिळतच नाही. असं तुमच्यासोबत झालंय का? आपलं व्यक्तिमत्त्व अष्टपैलू असूनही संधी हातातून निसटते, असं नेमकं का होतं याचं कारण ज्योतिषशास्त्रात सांगितलेलं आहे. रांचीमधील प्रसिद्ध ज्योतिषी संतोष कुमार चौबे यांनी याबाबत माहिती दिली. (शिखा श्रेया, प्रतिनिधी / रांची)
advertisement
advertisement
सर्वात आधी ब्रह्म मुहूर्तावर उठावं किंवा किमान सूर्योदयाच्या अर्ध्या तासापूर्वी उठायलाच हवं. यामुळे हळूहळू सूर्यदेवांचा आशीर्वाद मिळायला सुरूवात होते. परंतु कधीच सूर्योदयानंतर उठू नये. हा सूर्यदेवांचा अपमान मानला जातो. यामुळे व्यक्तीचा मान-सन्मानच नाही, तर चेहऱ्यावरील तेजही कमी होऊ शकतं.
advertisement
सकाळी उठल्यानंतर स्वच्छ आंघोळ करून तांब्यातून सूर्यदेवांना जल अर्पण करावं. मनोमनी सूर्य मंत्राचा जप करावा. रविवारी उपवास केला तर उत्तम किंवा या दिवशी चुकूनही मीठ खाऊ नये. यामुळे 2-3 महिन्यांतच आपल्याला बदल पाहायला मिळू शकतो. नोकरीसंबंधित अडचणी संपून प्रगतीचे मार्ग खुले होऊ शकतात, असा सल्ला ज्योतिषांनी दिला आहे.
advertisement
सूचना : इथं दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज18 मराठी त्याची हमी देत नाही.