Astro Tips: घरातील वाद-भांडणे काही केल्या कमी होईनात? या सोप्या उपायांनी लगेच दिसेल परिणाम
- Published by:Ramesh Patil
- trending desk
Last Updated:
Astro Tips: संसारात वाद, भांडण-तंटे होतातच, मात्र ते रोजरोज होऊ लागले, की घर म्हणजे लॉजिंग-बोर्डिंग होतं. सुख आणि समाधान घरातून हद्दपार होतं. एकमेकांशी चर्चा करून हे वाद सोडवता येऊ शकतात, पण कुटुंबीयांना तसं करावंसं वाटत नाही. अशा वेळी ज्योतिषशास्त्रातले उपाय कामी येऊ शकतात. कुटुंबातला कलह दूर करण्यासाठी ज्योतिषशास्त्रात काही उपाय सांगितलेले आहेत.
advertisement
ज्योतिषशास्त्रानुसार घरात दररोज कुटुंबीय किंवा शेजाऱ्यांशी वाद होत असतील, तर रोज सकाळी मिठाच्या पाण्याने फरशी पुसावी. यामुळे नकारात्मक ऊर्जा कमी होते. वास्तुदोषही काही प्रमाणात कमी होतो. मात्र गुरूवार व शुक्रवारी या पद्धतीने फरशी पुसू नये. ते शुभं नसतं. हे वाद ग्रह-नक्षत्रांमुळे होत असतील, तर घरात एकदा नवग्रह पूजा नक्की करून घ्या. यामुळे घरात सुख नांदतं व पत्रिकेतल्या ग्रहांचा अशुभ प्रभाव दूर होतो. घरातल्या सदस्यांची प्रगती होते. पूजा करताना ज्योतिषतज्ज्ञांची मदत घ्यावी.
advertisement
अमावास्या किंवा श्राद्ध पक्षांमध्ये पितरांना तर्पण किंवा जेवण द्यावं. कोणत्याही शुभ कार्यात त्यांचं स्मरण अवश्य करावं. कावळा, कुत्रा, गाय व चिमण्यांना खायला घालावं. मुंग्यांना पीठ खाऊ घालावं. वड किंवा पिंपळाच्या झाडाला पाणी घालावं. यामुळे पितृदोष दूर होतो. पितरांच्या आशीर्वादामुळे घरात शांतता व सुख नांदतं. कुटुंबीयांमध्ये जिव्हाळा निर्माण होतो.
advertisement
घरात नवरा-बायकोमध्ये भांडणं होत असतील, तर बायकोने नवऱ्याच्या उशीखाली रात्री झोपताना एक कापराची वडी ठेवावी. सकाळी नवऱ्याला न सांगताच ती कापराची वडी जाळावी व त्याची राख वाहत्या पाण्यात सोडावी. असं केल्यानं दोघांमधलं प्रेम टिकून राहील व नातंही घट्ट होईल. घरातल्या ईशान्य कोपऱ्यात दररोज शुद्ध तुपाचा दिवा लावावा.
advertisement
घरातली नकारात्मक ऊर्जा घालवण्यासाठी मंगळवारी हनुमानाची पूजा करावी. सकाळी व संध्याकाळी मारूतीसमोर पंचमुखी दिवा लावावा. अष्टगंध जाळून त्याचा सुगंध सगळ्या घरात पसरू द्यावा. यामुळे नकारात्मक ऊर्जा तर दूर होतेच, शिवाय घरातल्यांची प्रगतीही होते. तसंच लहान मुलांचे आजार, शिक्षणातले अडथळे आणि वाद यापासून सुटका होते.
advertisement
advertisement