फेब्रुवारीच्या पहिल्या 15 दिवसांतच होईल चांदी! बुध, शनी मिळून उजळतील 4 राशींच्या व्यक्तींचं भाग्य

Last Updated:
February 2025 Horoscope: ज्योतिषशास्त्रात प्रत्येक ग्रहाला विशिष्ट महत्त्व आहे. बुध ग्रहाला बुद्धी आणि संवादाचा कारक मानतात, तर शनी ग्रहाला न्यायदेवता म्हणतात. आता या दोन्ही ग्रहांची युती होणार आहे. त्यातून 4 राशींच्या व्यक्तींवर जणू सुखाचा वर्षाव होईल, असं ज्योतिषांनी सांगितलं आहे. (परमजीत कुमार, प्रतिनिधी / देवघर)
1/7
ज्योतिषशास्त्र सांगतं की, सर्व ग्रह-तारे वेळोवेळी आपली चाल, स्थिती बदलतात. त्यातून विविध योग जुळून येतात आणि त्याचा चांगला, वाईट परिणाम सर्व 12 राशींवर होतो. जेव्हा 2 ग्रहांचा प्रवेश एकाच राशीत होतो, तेव्हा त्या ग्रहांची युती झाली, असं म्हटलं जातं.

advertisement
2/7
देवघरमधील प्रसिद्ध ज्योतिषी पंडित नंदकिशोर मुद्गल यांनी दिलेल्या माहितीनुसार, येत्या 11 फेब्रुवारीला बुध आणि शनी ग्रहांची एकाच राशीत युती होणार आहे. कुंभ राशीत हे 2 ग्रह प्रवेश करतील. त्यातून कोणत्या राशींच्या व्यक्तींच्या वाट्याला सुवर्ण दिवस येतील, जाणून घेऊया.

3/7
मेष : बुध, शनी युतीचा भरभरून आशीर्वाद या राशीच्या व्यक्तींना मिळेल. दोन्ही ग्रहांच्या कृपेनं प्रामुख्यानं शैक्षणिक क्षेत्रात, करियरमध्ये लाभ मिळेल, उत्पन्न वाढेल, आर्थिक स्थिती सुधारेल. गुंतवणूक करण्यासाठी तो काळ सर्वोत्तम असेल.

4/7
मिथुन : बुध आणि शनी ग्रह कुंभ राशीत आले की, या राशीच्या व्यक्तींना भाग्याची पुरेपूर साथ मिळेल. रखडलेली सगळी कामं मार्गी लागतील. विशेष म्हणजे त्या काळात केलेल्या गुंतवणुकीतून भविष्यात प्रचंड नफा मिळेल. अगदी नोकरीत प्रमोशन मिळण्याचीही शक्यता आहे.

5/7
धनू : बुध आणि शनीच्या युतीचा सकारात्मक प्रभाव या राशीवरही पडणार आहे. मग वडिलोपार्जित संपत्तीबाबत जे काही वाद असतील ते मिटतील. कायदेशीर प्रकरणांमध्ये निकाल आपल्या बाजूनं लागेल. तसंच कामानिमित्त लांबचा प्रवास होईल आणि करियरमध्ये मनासारखं यश मिळेल.

6/7
कुंभ : याच राशीत बुध, शनी ग्रहांची युती होणार असल्यानं या राशीच्या व्यक्तींसाठी काळ अतिशय सुखद असेल. आत्मविश्वास कमालीचा वाढेल. समाजात मान-सन्मान मिळेल. उत्पन्नाचे नवे स्रोत निर्माण होतील. कामाच्या ठिकाणी शाबासकीची थाप मिळेल.

7/7
सूचना: इथं दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज18 मराठी त्याची हमी देत नाही.

Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement