Shravan 2024: श्रावणात उपवासानं येणार नाही अशक्तपणा; फक्त आहारात समावेश करा या पदार्थांचा
- Published by:Prachi Dhole
Last Updated:
श्रावण हा व्रतवैकल्यांचा महिना असतो. अनेक महिला या काळात उपवास करतात. सोळा सोमवार, श्रावणी सोमवार, श्रावणी शनिवार, तसंच गोकुळाष्टमी, नागपंचमी या दिवशी अनेक महिला उपवास करतात. सततच्या उपवासानं थकवा येऊ शकतो, काही गंभीर समस्याही उद्भवू शकतात. म्हणूनच उपवास केला तरी शरीरात ऊर्जा टिकून राहावी यासाठी आहारात काही विशिष्ट पदार्थांचा समावेश करता येऊ शकतो.
या महिन्यात अनेक जण उपवास करतात. काही जण केवळ सोमवार, शनिवारी उपवास करतात, तर काही जण संपूर्ण महिनाभर उपवास करतात.उपवासाचे शरीराला अनेक फायदे होतात. यामुळे शरीरातली विषारी द्रव्यं बाहेर टाकली जातात. त्यामुळे अधूनमधून उपवास करणं चांगलं असतं; मात्र काही जणांना उपवासामुळे चक्कर येणं, अशक्तपणा येणं अशा समस्या जाणवतात. त्याचं कारण उपवासाच्या फराळात ऊर्जादायी पदार्थांचा समावेश ते करत नाहीत.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
दूध व दुग्धजन्य पदार्थशरीराची प्रथिनांची व कॅल्शियमची गरज भरून काढण्यासाठी दूध व दुग्धजन्य पदार्थ खाता येऊ शकतात. त्यामुळे उपवास असताना आहारात दूध, दही, ताक, पनीर, तूप या पदार्थांचा समावेश करावा.
यंदाच्या श्रावणात उपवास करताना आहारात या पदार्थांचा समावेश केला तर अशक्तपणा येणार नाही व उपवासाचा फायदाही होईल.
advertisement