Mobile Numerology: गेम चेंजर मोबाईल नंबर, हा क्रमांक म्हणजे प्रगतीची चावी, तुमच्याकडे आहे का?
- Published by:Isha Jagtap
- local18
Last Updated:
आपलं सुख, दु:ख हे आपल्या कर्मांवरच अवलंबून असतं. परंतु ज्योतिषशास्त्राचाही आपल्या आयुष्यात मोलाचा वाटा असतो. वास्तूशास्त्र आणि अंकशास्त्र हे ज्योतिषशास्त्रातील महत्त्वाचे भाग आहेत. अंकशास्त्र सांगतं की, आपल्या जन्मतारखेसह विविध अंकांचा आपल्या आयुष्यावर नकळतपणे चांगला, वाईट परिणाम होत असतो. अगदी आपला मोबाईल नंबरही खूप महत्त्वाचा असतो. आज आपण मोबाईल नंबरमध्ये 8 अंक असण्याचं आणि नसण्याचं महत्त्व पाहणार आहोत. अंकशास्त्रानुसार, 8 हा करिअर, पैसा आणि ज्ञानाशी निगडित अंक आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
ज्यांच्या मोबाईल नंबरमध्ये 8 हा अंक एकदाही नसतो अशा व्यक्तींना पैशांबाबत असुरक्षित वाटतं. या व्यक्ती स्वतःच्या ध्येयापासून विचलित होऊ शकतात किंवा स्वतःकडे असलेलं सर्वकाही दुसऱ्यांसाठी गमावून बसतात. त्यांच्याकडे पैसा आला की बऱ्याचदा त्या गरज नसलेल्या ठिकाणी तो खर्च करतात. त्यामुळे पैसा दीर्घकाळ टिकत नाही.
advertisement
मोबाईल नंबरमधल्या सर्व अंकांची बेरीज 8 असेल तर असा मोबाईल नंबर असलेल्या व्यक्तींना आयुष्यात खूप कष्ट करावे लागण्याची शक्यता असते. या व्यक्तींना शिक्षणात यश मिळतं, त्यांची नफा कमावण्याची क्षमता नक्कीच वाढते. मात्र अपार कष्ट केल्यानंतर त्यांना यश मिळतं. त्यामुळे त्या कोणावरही सहज विश्वास ठेवत नाहीत. अति कामामुळे त्यांना आरोग्याबाबत समस्या उद्भवतात.
advertisement