Gudi Padwa 2024: गुढीपाडवा कसा साजरा करतात? इतर राज्यात गुढीपाडव्याला काय म्हणतात
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Gudi Padwa 2024 : हिंदू धर्मामध्ये गुढीपाडव्याच्या सणाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या प्रतिपदेपासून मराठी नववर्षाची सुरुवात होते आणि या दिवशी गुढीपाडव्याचा सण संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर लोक आनंदानं खरेदी करतात.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
चैत्र नवरात्रीची सुरुवातही याच दिवशी होते. या दिवशी महाराष्ट्रातील लोक गुढी उभारतात, म्हणूनच या सणाला आपल्याकडे गुढी पाडवा म्हणतात. बांबूच्या वर चांदी, तांबे किंवा पितळेचा उलटा कलश ठेवला जातो आणि तो सुंदर साडी किंवा कापडाने सजवला जातो. साधारणपणे हे कापड भगव्या रंगाचे आणि सिल्कचे असते. गुढी, कडुलिंबाची पाने, आंब्याची देठ आणि लाल फुले यांनी सजवली जाते. घराच्या छतासारख्या उंच जागेवर गुढी ठेवली जाते, जेणेकरून ती दुरूनच दिसावी. अनेक जण घराच्या मुख्य दरवाजा किंवा गॅलऱ्यांमध्येही उभारतात.








