Hariyali Teej 2025: लग्नाची चिंता मिटवा! हरियाली तीजला करा 'हे' उपाय, मिळेल मनासारखा जोडीदार!
- Published by:Arjun Nalavade
- local18
Last Updated:
Hariyali Teej 2025: हरियाली तीजला सनातन धर्मात विशेष महत्त्व आहे. विवाहित स्त्रिया पतीच्या दीर्घायुष्यासाठी तर अविवाहित मुली इच्छित वरासाठी हे व्रत करतात. या दिवशी भगवान...
सनातन धर्मात हरियाली तीजच्या उपवासाला खूप महत्त्व दिलं जातं. या दिवशी विवाहित महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी देवी पार्वती आणि भगवान शंकराचा उपवास करतात, तर अविवाहित मुली इच्छित वर मिळवण्यासाठी उपवास करतात. या दिवशी भगवान शंकर आणि देवी पार्वतीची विधीनुसार पूजा करावी. भगवान शंकराच्या शिवलिंगावर जलाभिषेक करावा.
advertisement
advertisement
हिंदू कॅलेंडरनुसार, यावर्षी हरियाली तीज 27 जुलै रोजी साजरी केली जाईल. अयोध्या येथील ज्योतिषी पंडित कल्की राम सांगतात की, श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षाची तृतीया तिथी 26 जुलै रोजी रात्री 10 वाजून 41 मिनिटांनी सुरू होईल आणि 27 जुलै रोजी रात्री 10 वाजून 42 मिनिटांनी संपेल. लग्नात काही अडथळा येत असेल, तर या दिवशी भगवान शंकर आणि माता लक्ष्मीशी संबंधित काही विशेष उपाय नक्की करावेत.
advertisement
advertisement
जर तुमचं लग्न होत नसेल आणि विवाहात अडथळे येत असतील, तर अशा परिस्थितीत हरियाली तीजला स्नान केल्यानंतर लाल रंगाचे कपडे परिधान करावेत. शिव-शक्तीची पूजा करावी. भगवान शंकराला दुधाने अभिषेक करावा. माता पार्वतीला कुंकू-सिंदूर अर्पण करावं आणि त्यानंतर भगवान शंकर आणि माता पार्वतीला लवकर लग्नासाठी प्रार्थना करावी. असं केल्याने विवाहात येणारे अडथळे दूर होतात.
advertisement