Lord Shiva : शिवलिंगाला त्रिपुंड लावताना तुम्ही ही चूक करत नाही ना? जाणून घ्या योग्य पद्धत
- Published by:Pooja Jagtap
- trending desk
Last Updated:
हिंदू धर्मात प्रत्येक देवदेवतेच्या पूजा-विधीच्या काही विशिष्ट नियमांचं पालन केलं जातं. प्रत्येक देव-देवतेला गंध, टिळा लावण्याच्या पद्धतीदेखील वेगवेगळ्या आहेत. भगवान शंकराच्या पिंडीला तीन बोटांनी भस्म अर्थात त्रिपुंड लावलं जातं. शिवपिंडीला अशा पद्धतीनं त्रिपुंड लावण्यामागे काही शास्त्रीय कारणं आहेत. या त्रिपुंडामध्ये अनेक देवदेवतांच्या शक्ती सामावलेल्या असतात, असं सांगितलं जातं. त्रिपुंड लावण्याची योग्य पद्धतं, त्याचे फायदे याबाबत सविस्तर जाणून घेऊ या.
हिंदू धर्मात पूजा विधी करताना कपाळावर टिळा लावला जातो. देवदेवतांची पूजा केल्यावर विशिष्ट प्रकारचा टिळा लावला जातो. त्यामुळे त्यांचं रूप अधिकच सुंदर दिसतं. भगवान शंकराची पूजा करताना शिवपिंडीला तीन बोटांनी भस्म अर्थात त्रिपुंड लावलं जातं. यासाठी चंदनाचादेखील वापर होतो. या त्रिपुंडामध्ये अनेक देवी-देवतांच्या शक्ती सामावलेल्या असतात, असं मानलं जातं.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement








