तब्बल 100 वर्षांनी जुळून आले योग, ही अक्षय्य तृतीया साधी नाही; 3 राशींवर वर्षभर होईल धनवृष्टी
- Published by:Isha Jagtap
- local18
Last Updated:
अक्षय्य तृतीया हा वर्षभरातल्या सर्वात शुभ दिवसांपैकी एक दिवस मानला जातो. या दिवशी सोनं खरेदी करण्याला आणि दान पुण्य करण्याला अनन्यसाधारण महत्त्व असतं. या दिवशी देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची मनोभावे पूजा केली जाते. शिवाय घरात आवर्जून शुभकार्य पार पाडलं जातं. परंतु यंदाची अक्षय्य तृतीया ही त्यापलीकडेही खास असणार आहे. नेमकं काय आहे यंदा, जाणून घेऊया ज्योतिषांकडून. (परमजीत कुमार, प्रतिनिधी / देवघर)
झारखंडमधील देवघरचे प्रसिद्ध ज्योतिषी पंडित नंदकिशोर मुद्गल यांनी दिलेल्या माहितीनुसार, यंदा 10 मे रोजी अक्षय्य तृतीयेचा सण साजरा होईल. याच दिवशी तब्बल 100 वर्षांनी वृषभ राशीत चंद्र आणि गुरू ग्रहाची युती होणार आहे. त्यातूनच निर्माण होईल गजकेसरी राजयोग. हा अत्यंत शुभ योग मानला जातो. शिवाय याच दिवशी रवी, मालवय आणि उत्तम हे योगही जुळून येणार आहेत. या सर्व योगांच्या संयोगाने 3 राशींच्या व्यक्तींचं नशीब पार उजळून निघेल. त्यांच्यासाठी हे पूर्ण सुख-समृद्धी आणि आनंदाचं असेल.
advertisement
मेष : अक्षय्य तृतीया आपल्यासाठी अत्यंत सकारात्मक ठरेल. देवी लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्या पाठीशी कायम असेल. त्यामुळे नवं काम सुरू करण्यासाठी हा कालावधी उत्तम आहे, त्यातून आपला फायदाच होईल. नवी मालमत्ता खरेदी करण्याचाही योग आहे. बऱ्याच काळापासून अडकलेली कामं आता मार्गी लागतील. धन-धान्याचीही वृद्धी होईल.
advertisement
कर्क : आपल्यावर अक्षय्य तृतीयेचा अत्यंत सकारात्मक परिणाम होणार आहे. कुटुंबात सुरू असलेल्या अडचणी आता संपतील. अक्षय्य तृतीयेला सोनं किंवा चांदी खरेदी केल्यास त्यातून भरभराट होईल. वाहन, जमीन किंवा घर खरेदीसाठी हा काळ शुभ आहे. पालकांना मुलांकडून शुभवार्ता मिळतील. व्यवसायात केलेल्या गुंतवणुकीतून आपला फायदा होईल.
advertisement
सिंह : आपल्यासाठी हा काळ अत्यंत सुखद असणार आहे. नोकरीत मनासारखी बदली मिळेल. व्यवसायात आर्थिक लाभ होण्याचा योग आहे. नवा व्यवसाय सुरू करायचा असेल तर हा काळ उत्तम आहे. घरात शुभकार्य पार पडेल. कुटुंबियांसोबत चांगला वेळ घालवाल. आपल्यावर कर्ज असेल तर आता कर्जमुक्त व्हाल. वर्षभर आपल्यावर लक्ष्मी देवीची कृपा असेल.
advertisement
सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.